मनसेच्यावतीने मराठी व्यावसायिकांसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरात यशस्वी मराठी उद्योजक करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:29 PM2018-02-26T16:29:40+5:302018-02-26T16:29:40+5:30

मनसेच्यावतीने मराठी व्यावसायिकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे मंगळवारी आयोजन केले आहे. या शिबिरात यशस्वी मराठी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.

The Marathi businessmen will be successful in the free guidance camp organized by MNS for the Marathi businessmen | मनसेच्यावतीने मराठी व्यावसायिकांसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरात यशस्वी मराठी उद्योजक करणार मार्गदर्शन

मनसेच्यावतीने मराठी व्यावसायिकांसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरात यशस्वी मराठी उद्योजक करणार मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देमराठी व्यावसायिकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन शिबिर२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान शिबिरमराठी तरुणांनी उद्योजक व्हावे या हेतूने शिबिर

ठाणे: २७ फेब्रुवारी ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठीराजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठीराजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरुणांनी उद्योजक व्हावे या हेतूने ठाणे शहरातील मराठी यशस्वी उद्योजकांमार्पत नवीन तसेच स्वत: व्यवसाय करणाऱया मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसंदर्भात ठाण्यातील लुईसवाडी येथील शहनाई हॉलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

    मराठी पाट्यांचा आग्रह करत असतानामराठी व्यावसायिक घडविले पाहिजेत या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, हॉटेल्स, आरोग्य, शेअर मार्केट, लग्न समारंभ इत्यादी क्षेत्रांमधील ठाण्यातील यशस्वी उद्योजकांकडूनया शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठी व्यावसायिकांचा समूह तयार करण्यात येणार आहे. तसेच त्यांना हमखास व्यवसायमिळावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारे अर्थसाह्य बँकांकडून कसे मिळवावे याकरिता बँक क्षेत्रातीलमान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश उतेकर, लोकमत ठाणेचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान, शेअर मार्केट तज्ञ शशांक रावले, हॉटेल मालक किरण भिडे, लग्न समारंभ, कॅटरिंग व्यवसायातील महेश चाफेकर, इव्हेंट मॅनेजमेंट मधील संदीप वेंगुर्लेकर, औषध व्यावसायीक संजय धनावडे, ठाण्यातील वृत्तपत्र व्यावसायिक निखिल बललळ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नंदकुमार पावस्कर, मराठी अभ्यास केंद्राचे आनंद भंडारे, कवी आदित्य दवणे, बांधकाम व्यवसायिक प्रतिक पाटील, राजभाषा चित्रपटाचे ज्ञानेश्वर मर्गज इत्यादी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्पामाचे प्रास्ताविक नरेंद्र बेडेकर करणार आहेत. कार्यक्रमाला अमित राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मराठी व्यावसायिकांना व्यवसाय करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा व्यावसायिकांना यशस्वी व्यावसायिकमार्गदर्शन करणार आहेत तसेच एकत्रित आल्यामुळे हमखास व्यवसाय देखील मिळणार आहे. गृहिणी, कॉलेजमध्ये शिकणारे वभविष्यात व्यवसाय करू  इच्छिणारे विद्यार्थी यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे मनविसेचे शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी आवाहन केले आहे. सदर मार्गदर्शन शिबीर यशस्वी करण्याकरिता मनविसेचे रविंद्र पाटील, किरण पाटील, अमित मोरे, विवेक भंडारे, विजय रोकडे, संदिपचव्हाण, दीपक जाधव, अरविंद बाचकर, प्रमोद पताडे, राकेश आंग्रे इत्यादी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

Web Title: The Marathi businessmen will be successful in the free guidance camp organized by MNS for the Marathi businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.