ठाण्यातील टेंभीनाक्यावर 'काळ्या' शब्दात मराठी लिहून केला गुजराती बॅनरला विरोध

By अजित मांडके | Published: June 20, 2023 01:58 PM2023-06-20T13:58:12+5:302023-06-20T13:59:01+5:30

त्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो

Marathi was written in 'black' on Tembhinaka in Thane in opposition to the Gujarati banner | ठाण्यातील टेंभीनाक्यावर 'काळ्या' शब्दात मराठी लिहून केला गुजराती बॅनरला विरोध

ठाण्यातील टेंभीनाक्यावर 'काळ्या' शब्दात मराठी लिहून केला गुजराती बॅनरला विरोध

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कच्छ समाजाचे नवीन वर्ष आषाढी बिज या नवीन वर्षाचे औचित्य साधून त्या समाजातील मान्यवरांचा सत्कार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मंगळवारी आयोजित केला आहे. यासंदर्भात टेंभीनाक्यावर शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेल्या बॅनरच्या अगदी बाजूला एक गुजराती भाषेत मोठा बॅनर लावण्यात आला आहे. मात्र त्या गुजराती भाषेतील त्या बॅनरवर आयोजकांच्या फोटोच्या बाजूला चक्क काळ्या अक्षरात ' मराठी ' असे लिहून ठाण्यात बॅनर गुजरातीत नाहीतर मराठीत असावा अशाप्रकारची भावना या माध्यमातून व्यक्त केली गेली आहे. यावरून ठाण्यात भाषावाद उफळण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्या बॅनर दिवंगत शिवसेना प्रमुख, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुखांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे त्या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे किंवा त्या पक्षाचे नेतेमंडळी काय भूमिका मांडतात यांच्याकडे आता ठाणेकर नागरिकांसह मराठी माणसाचे लक्ष लागले आहे.

कच्छ अस्मिता मंच, ठाणे या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाऱ्या समाजातील मान्यवरांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो. यंदा हा कार्यक्रम मंगळवार २० जून २०२३ रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित आला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा (शहा) यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासंदर्भात टेंभीनाक्यावरच हा बॅनर लावण्यात आला आहे. त्याच्यावर गुजरात भाषेत समाज बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहे. मध्यंतरी राज्यात मोठया प्रमाणात भाषावाद पाहण्यास मिळाला. शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मतांसाठी हे पाऊल उचलले असे बोलले जात होते. तर आता शिवसेनेचे दोन तुकडे पडले आहेत. त्यातच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि ते ही टेंभीनाक्यावर गुजराती भाषेत बॅनर लावण्यात आले आहे. त्याच्याकडे राजकीय मंडळींनी जरी डोळे झाकले केली असली तरी दक्ष असलेल्या कार्यकर्त्याने काळ्या रंगाने मराठी लिहून जणू अंजन भरले आहे. अशी प्रतिक्रिया दबक्या शब्दात उमटत आहे. यावरून आता भाषावाद वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Web Title: Marathi was written in 'black' on Tembhinaka in Thane in opposition to the Gujarati banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे