मॅरेथॉनचा मार्ग खड्ड्यांतूनच

By admin | Published: August 28, 2016 04:02 AM2016-08-28T04:02:10+5:302016-08-28T04:02:10+5:30

मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Marathon's path is in the pothole | मॅरेथॉनचा मार्ग खड्ड्यांतूनच

मॅरेथॉनचा मार्ग खड्ड्यांतूनच

Next

ठाणे : मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. रविवारी होणाऱ्या २७ व्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज झाली असली तरी मॅरेथॉनच्या काही प्रमुख मार्गांवर आजही खड्डे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदादेखील स्पर्धकांना अडथळ्यांची शर्यत पार करून स्पर्धेत बाजी मारावी लागणार आहे.
स्पर्धेचे यंदाचे हे २७ वे वर्ष असून सुमारे २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे. दरम्यान, यंदा ठाण्यात मागील वर्षीपेक्षा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. पालिकेमार्फत अथवा नेमलेल्या ठेकेदारामार्फत आणि जेट पॅचरच्या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सध्या शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. असे असले तरी ब्रेक घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा बुजवलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी परत एकदा ते पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या कामाचे पितळ यापूर्वीच उघड झाले आहे.
दरम्यान, मागील वर्षी मॅरेथॉनपूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक ठिकाणी किंबहुना प्रमुख मार्गावर खड्डे राहिल्याने अनेक स्पर्धकांना त्यातून मार्गक्रमण करावे लागले होते. यंदादेखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापौर संजय मोरे यांनी मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु, पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने या मार्गावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या २१ किमी आणि महिलांच्या १५ किमीच्या स्पर्धेच्या प्रमुख मार्गावरच ते आहेत. कापूरबावडी, माजिवडानाका येथे तर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Marathon's path is in the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.