बालविज्ञान परिषदेत मराठवाडा, विदर्भातील सहभाग रोडावला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:50 AM2018-12-05T01:50:11+5:302018-12-05T01:50:18+5:30
ठाणे : मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ...
ठाणे : मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत तेथील विद्यार्थ्यांनी अल्प सहभाग घेतला. दरवर्षी या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत असतात. मात्र, यंदा दुष्काळाचा परिणाम त्यांच्या सहभागी संख्येवर झाल्याची माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली. ही परिषद भुवनेश्वर येथे २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. परिषदेचे हे २६ वे वर्ष आहे.
या परिषदेसाठी शहरी आणि ग्रामीण मुलांचा सहभाग समप्रमाणात असतो. परंतू यंदा बीड, परभणी, नागपूर, हिंगोली, वाशिंद, चंद्रपूर, गोंदीया येथून खाजगी आणि जिल्हा परिषद शाळांचे प्रकल्प अल्प प्रमाणात आले, असे दिघे म्हणाले. मुलींची, विशेषत: ग्रामीण भागांतील मुलींचा सहभाग वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. एकीकडे इंग्रजी माध्यमांचा सहभाग वाढत असला तरी दुसरीकडे मराठी शाळांचा सहभाग कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुली विज्ञान आणि मुले तंत्रज्ञान विषयांकडे वळत असल्याचे यंदाच्या प्रकल्पांतून जाणवले. स्वच्छ, हरित आणि आरोग्य संपन्न देशासाठी: विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना हा या वर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय आहे.
राष्ट्रीय परिषदेसाठी राज्याचा ३० बाल वैज्ञानिकांचा चमू, नुकत्याच ज्ञान प्रबोधिनी, हरारी, उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या राज्य परिषदेत निवडला गेला. या तीस जणाच्या चमूत २० मुली आणि १० मुले असून शहरी भागातील २१ आणि ग्रामीण भागातील ९ शाळांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमाची २१ विद्यार्थी असून ९ विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. जिल्हावारी, ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली असून, ठाणे शहरातील ७ प्रकल्पांची निवड राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. त्या मागोमाग मुंबई पूर्व उपनगर ५, पुणे ५, मुंबई पश्चिम उपनगर ३, रायगड ३, रत्नागिरी २, उस्मानाबाद २, कोल्हापूर १, अमरावती १, वर्धा १ यांची निवड झाली आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेससाठी लहान गटात ठाण्यातील श्रीमती सुलोचना सिंघानिया स्कूल तर मोठ्या गटातून लोधिवली, खालापूर येथील रिलायन्स फाऊंडेशन या शाळांची निवड झाली आहे.
>हे आहेत सहभागी प्रकल्प
मंगळवारी पत्रकारांसोबत झालेल्या वार्तालापात निवड झालेल्या शाळांनी आपले प्रकल्प सादर केले. यात पनवेल येथील रिलायन्स फाऊंडेशनच्या हिमानी जोशी आणि केतकी लबडे या विद्याथीर्नींनी ‘स्त्रीयांच्या मासीकपाळीमध्ये वापरण्यात येणाºया सॅनिटरी नॅपकिनमुळे होणाºया घनकचºयाचे व्यवस्थापन आणि त्याला पर्यावरणपुरक पर्याय’ हा प्रकल्प हाताळला आहे. सिंघानिया शाळेच्या दीप देसाई आणि कार्तिक वारियर यांनी ‘निसर्ग संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन याचे सुयोग्य मिश्रण’, याच शाळेच्या अक्षी टकले आणि इशान खडसे यांनी ‘सॅनिटरी नॅपकिनचे विघटन करण्यासाठी पर्याय शोधणे’, ए. के. जोशीच्या अवनी साठे आणि रमा राईलकर यांनी ‘नापीक जमीन सुपीक बनविण्यासाठी नैसर्गीक स्त्रोतांचा वापर’, घोडबंदर रोड येथील सरस्वती विद्यालयाच्या केतकी पवार आणि पुर्वा सावंत यांनी फुलांच्या कचºयाचे विघटन आणि पुनर्वापर, डॉ. बेडेकर विद्या मंदिराच्या प्रज्ञा मोरे आणि नाविन्य मेटकरी यांनी प्लास्टिकला पर्याय दिला आहे. श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाने ‘प्लास्टिक बंदी आणि उपाय’ तर लोकपुरम पब्लिक स्कूलच्या अभिनव गणेश आणि तन्मय कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी ‘ओलावा संवेदना आणि सिंचन रोबोट’ हा विषय हाताळला आहे.