भिवंडीत टोरंट पॉवर विरोधात मोर्चा; शेकडो नागरिक सहभागी
By नितीन पंडित | Published: September 1, 2023 06:27 PM2023-09-01T18:27:19+5:302023-09-01T18:27:29+5:30
शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चास प्रारंभ झाला तर स्व आनंद दिघे चौक येथ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
भिवंडी: शहर तसेच ग्रामीण भागात वीज वितरण करणाऱ्या टोरंट पावर कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे शहरातील जनता व व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.टोरंट पॉवर कंपनी भिवंडीतून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत शहरात अनेक मोर्चा व आंदोलने करण्यात आली आहेत.त्यानंतर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून शुक्रवारी भिवंडीत विराट मोर्चा काढण्यात आला.
वाढीव वीज दर ,वीज ग्राहकांवर खोट्या वीज चोरीच्या केसेस दाखल करणे,टोरंट पॉवर कंपनीची दादागिरी या तसेच अनेक मागण्या या मोर्चात करण्यात आल्या .तर मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास थळे,मनोज गगे,शिवसेना महिला जिल्हा संघटक वैशाली मेस्त्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी,सुरेश पवार,महेंद्र पाटील,काँग्रेसचे सलाम शेख,अशोक पाटील,पंकज गायकवाड यांच्यासह शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.
शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चास प्रारंभ झाला तर स्व आनंद दिघे चौक येथ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या मोर्चात संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे,काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे,काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर,काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले .या मोर्चात शहर व ग्रामीण भागातून स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.