जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष समितीचा पडघा ते मुंबई पायी मार्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 10:43 PM2021-12-21T22:43:40+5:302021-12-21T22:45:01+5:30

भिवंडीतून निघालेला पायी मोर्चा बुधवारी ठाणे त्यानंतर मुंबईत मंत्रालय येथे धडकणार असल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली आहे .   

March foot march from Padgha to Sangharsh Samiti to demand old pension | जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष समितीचा पडघा ते मुंबई पायी मार्च 

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष समितीचा पडघा ते मुंबई पायी मार्च 

googlenewsNext

-नितिन पंडीत 

भिवंडी- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भिवंडीतील पडघा ते मुंबई असा पायी लॉंग मार्च मोर्चा काढण्यात आला . दुपारनंतर हा लॉन्ग मार्च पडघा येथून भिवंडीतील सोनाळे येथील मैदानावर थांबला होता. या मोर्चात शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गांधीजींचा वेष परिधान करून प्रतीकात्मक पायी यात्रा काढली असून पेन्शन आमच्या हक्काची , कोण म्हणतो देणार नाही अशा प्रकारच्या घोषणा देत जुन्या पेन्शनची मागणी केली आहे . मंगळवारी भिवंडीतून निघालेला पायी मोर्चा बुधवारी ठाणे त्यानंतर मुंबईत मंत्रालय येथे धडकणार असल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली आहे .   

Web Title: March foot march from Padgha to Sangharsh Samiti to demand old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.