जालन्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By सुरेश लोखंडे | Published: September 2, 2023 07:08 PM2023-09-02T19:08:03+5:302023-09-02T19:08:25+5:30
कळवा परिसरात या कार्यकर्त्यानी एकत्र येथे या जालना घटनेचा निषेध करून आंदाेलन छेडले.
ठाणे - जालना येथे मराठा समाजाच्या आंदाेलकांवर पाेलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यानी येथील तलावपालीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर आंदाेलन छेडले. यावेळी बहुतांशी कार्यकर्त्यानी काळे शर्ट परिधान करून सहभाग नाेंदवला.
या कार्यकर्त्यांचा हा माेर्चा पुढे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार हायहायच्या घाेषणा देत आंदाेलन छेडले. याप्रमाणेच कळवा परिसरात या कार्यकर्त्यानी एकत्र येथे या जालना घटनेचा निषेध करून आंदाेलन छेडले.
काॅंग्रेस युवा कार्यकर्त्यांचे आंदाेलन
येथील गाेकुळदासवाडी, खाेपट येथे काॅग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सायंकाळी जालना येथील घटनेच्या निषेर्धार्थ् आंदाेलन केले. युवक काॅग्रेसचे सागर लबडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी घाेषणा देत हे आंदाेलन छेडले.