दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या, हत्येप्रकरणी मारेक-याला ८ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:20 AM2017-09-09T03:20:22+5:302017-09-09T03:20:40+5:30
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने वृद्धाला जीवे मारणाºयास ठाणे न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा ठोठावली.
ठाणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने वृद्धाला जीवे मारणाºयास ठाणे न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा ठोठावली. ही घटना कळवा-विटावा येथे २९ जुलै २०१५ रोजीच्या पहाटे घडली होती. विटावा येथील राजेश भीमराव इंगळे (३०) असे शिक्षा सुनावलेल्या मारेकºयाचे नाव आहे. कळव्यात राहणारे जोसेफ मिरांडा (६०) यांची त्याने हत्या केली.
राजेश याने २९ जुलै रोजी पहाटे १.२० च्या सुमारास कळव्यातील भीमनगर वाचनालय परिसरात जोसेफ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी विरोध केल्यावर राजेशने त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढल्याने त्यांच्यात वाद झाला. याचदरम्यान, त्याने लोखंडी रॉडने जोसेफ यांना डोक्यावर आणि चेहºयावर मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.