जिल्ह्यातील बाजारपेठा शुक्रवारी बंद ठेवण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:30+5:302021-02-23T05:00:30+5:30
ठाणो : केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटी व तरतुदी लागू केल्या आहेत. त्याविरोधात व्यापारी कॉनफेडरेशन ...
ठाणो : केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटी व तरतुदी लागू केल्या आहेत. त्याविरोधात व्यापारी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी २६ फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारणार आहे. त्यात सहभागी होऊन जिल्ह्यातही ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्याचा इशारा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या भेटी दरम्यान कॅटच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी दिला.
केंद्रीय अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटीशर्ती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यास विरोध करून या जाचक अटीशर्ती मागे घेण्यासाठी व्यापारी देशव्यापी बंद पुकारणार आहेत. या व्यापाऱ्यांचे नेतृत्व कॅटव्दारे केले जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी कॅटचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठा बंद ठेवणार आहे. त्यास अनुसरून ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या नावे निवेदन देऊन बाजारपेठा बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. या शिष्टमंडळात शंकर ठक्कर, आमरसी कारिया, उदय ठक्कर, केशव पांडे आदी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.
...........
फोटो आहे-
कॅप्शन - सेवा करामध्ये केंद्र शासनाने लागू केलेल्या जाचक अटींविरोधात जिल्ह्यातील व्यापारी देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देताना कॅटचे पदाधिकारी.
...............