खुणावणारे हात व्यस्त झाले दिवे रंगविण्यात; श्री साई संस्थेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 04:58 PM2021-10-26T16:58:24+5:302021-10-26T17:00:02+5:30

श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंग खान यांनी या महिलांना दिवाळी साठी दिवे रंगवून ते विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे.

Marking hands engaged in painting the lamps; Initiative of Shri Sai Sanstha in bhiwandi | खुणावणारे हात व्यस्त झाले दिवे रंगविण्यात; श्री साई संस्थेचा पुढाकार

खुणावणारे हात व्यस्त झाले दिवे रंगविण्यात; श्री साई संस्थेचा पुढाकार

Next

भिवंडी- देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणजे सदैव सावजाला खुणावणारे हात नजरेस पडतात. परंतु भिवंडी शहरातील हनुमान टेकडी या वस्तीतील महिलांचे हात दिवाळीतील पणत्या रंगविण्यात दंग झाले आहेत. येथील महिलांसाठी काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंग खान यांनी या महिलांना दिवाळी साठी दिवे रंगवून ते विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे.

संस्थेच्या माध्यमातून तब्बल पाच हजार पणत्या येथील महिला रंगसंगतीन सजवून त्या संस्थेच्या माध्यमातून विक्री करीत असून सर्व दिवे बाजारात संस्थेच्या माध्यमातून  पाच हजार दिवे विक्री साठी तयार आहेत. मागील चार वर्षात या भागातील महिलांमध्ये श्री साई सेवा संस्था आरोग्य शिक्षण ,जनजागृती व समुपददेशना द्वारे केलेल्या कार्यतून येथील २५ हुन अधिक महिलांना या नरकयातना भोगायला लागणाऱ्या देह व्यापार व्यवसायापासून परावृत्त करीत त्यांना व्यवसायाची संधी दिली आहे .

Web Title: Marking hands engaged in painting the lamps; Initiative of Shri Sai Sanstha in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.