हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
By admin | Published: March 18, 2017 02:26 AM2017-03-18T02:26:16+5:302017-03-18T02:26:16+5:30
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भार्इंदरच्या जेसल पार्क येथे राहणारा पती नवीन कोठारी, सासरे रमेश आणि सासू सुमन यांनी नवीनच्या पत्नीचा तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी छळ केला. तिच्या स्त्रीधनाचाही अपहार केला. तिच्या संमतीशिवाय नवीन याने तिचा लैंगिक छळ केला. तसेच तिची बदनामी केली. शिवाय, तिच्या माहेरी न कळवता लायपोसक्शन ही शस्त्रक्रियाही केली. १५ फेब्रुवारी २०१५पासून जेसल पार्क, भार्इंदर, गोवा, सुरत, केरळ, बंगळुरू आणि इगतपुरी आदी ठिकाणी छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने ठाणेनगर पोलीसांत हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार या कलमांखाली १६ मार्च २०१७ रोजी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)