तुलसी विवाहानंतर विवाह मुहूर्तांची चंगळ - पंचांगकर्ते दा.कृ.सोमण
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 9, 2024 02:05 PM2024-11-09T14:05:50+5:302024-11-09T14:06:21+5:30
तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार 13 नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 15 नोव्हेंबर पर्यंत करावयाचा आहे.
ठाणे - यावर्षी तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार 13 नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 15 नोव्हेंबर पर्यंत करावयाचा आहे. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभ होईल. कपडे, सोने-चांदीची बाजारपेठ मंगल कार्यासाठी सजेल. यावर्षींच्या विवाह मुहूर्ताबद्दलची माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.
नोव्हेंबर 2024 मध्ये 17,22, 23, 25, 26, 27 या दिवशी विवाह मुहूर्त आहेत.
डिसेंबर 2024 मध्ये 3, 5,6,7,11,12, 14,1520,23, 24,26 या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. जानेवारी 2025 मध्ये 16.17.19,21,22,26 या दिवशी विवाह मुहूर्त आहेत.
फेब्रुवारी 2025 मध्ये 3, 4,7,13,16,17,20,21,22,23,25 या दिवशी विवाह मुहूर्त आहेत.
मार्च 2025 मध्यै1,2,3,6,7, 12, 15 रोजी विवाह मुहूर्त आहेत.