विवाहितेचा छळ; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By admin | Published: December 12, 2015 02:33 AM2015-12-12T02:33:07+5:302015-12-12T02:33:07+5:30
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घर घेण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या नवी मुंबईतील जालिंदर
ठाणे : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घर घेण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या नवी मुंबईतील जालिंदर (नवरा), बेबी (सासू), बाबाजी (दीर), साधना (जाऊ) आणि गव्हाणे (मावस सासू) तसेच नितीन (मावस दीर) यांच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादींना वडिलांनी लग्नात जास्त वस्तू व दागिने दिले नाहीत. तू घरात नीट काम करीत नाहीत. तुझी वर्तणूक चांगली नाही, असे म्हणून चारित्र्यावर संशय घेत. नवीन घर घेण्यास पाच लाख रुपये आणत नाही म्हणून शिवीगाळ करून छळ सुरू केला. लग्नातील स्त्रीधन हडपल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. हा प्रकार मे २०१३ ते १ नोव्हेंबर २०१५ दरम्यान नवी मुंबई, सानपाडा आणि वागळे इस्टेट व पुणे आंबेगाव येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात अद्यापही कोणाला अटक केली नसल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.