ठाण्यात चारित्र्याच्या संशयाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Published: February 28, 2019 07:21 PM2019-02-28T19:21:17+5:302019-02-28T19:28:23+5:30

चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरुन पतीबरोबर नेहमीच भांडणे होत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनिषा उर्फ प्रियंका गुजर (२७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यात घडली.

Married woman hang herself due to quarrel with husband | ठाण्यात चारित्र्याच्या संशयाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर उघड झाला प्रकार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पतीबरोबर नेहमीच व्हायचा वाद

ठाणे: पतीसोबत होणाऱ्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून मनिषा उर्फ प्रियंका संदेश गुजर (२७, रा. पिंगळे चाळ, नितीन कंपनी, गणेशवाडी, ठाणे )या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा आणि संदेश यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. त्यांना एक सात वर्षांची मुलगीही आहे. तिच्या चारित्र्यावर तो नेहमीच संशय घेत असे. यातूनच दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. एक दोन वेळा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. नातेवाईक, शेजारी तसेच पोलीस यांनीही त्यांची याआधी समजूत घातली होती. मात्र, संशयाच्या भूताने पछाडल्यामुळे तो नेहमीच तिला मोबाईल मागत असे. मोबाईलचा पासवर्डही मागायचा. तिने मोबाईल न दिल्यामुळेही त्यांचा वाद विकोपाला जात होता, अशी माहिती पोलीस चौकशीमध्ये पुढे आली आहे. २८ फेब्रुवारी नेहमीप्रमाणे तो सकाळी कामाला गेला होता. तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळपासून घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा वाजविला. त्यांच्यापैकीच एकाने खिडकीतून आत पाहिले तर तिने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबतची माहिती नौपाडा पोलिसांना देण्यात आली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Married woman hang herself due to quarrel with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.