विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या जावयावर ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:37 PM2017-12-17T18:37:48+5:302017-12-17T18:40:43+5:30

मेहुणीच्या लग्नाच्या आधीपासून तिच्या प्रेम करणार्‍या एका जावयाने तिचा शनिवारी भररस्त्यात विनयभंग केला. नौपाडा पोलीस या जावयाचा शोध घेत आहेत.

Married woman molested, brother-in-law booked in Thane | विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या जावयावर ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या जावयावर ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देभररस्त्यात पकडला हातआरोपीचा शोध सुरूलग्नाच्या आधीही झाला होता वाद

ठाणे : विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या एका जावयाविरूद्ध नौपाडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. लग्नाच्या आधीपासून आरोपीचे पीडित महिलेवर प्रेम होते.
खोपट येथे राहणार्‍या २७ वर्षीय पीडित महिलेच्या आईला शनिवारी गावी जायचे होते. आईला बसमध्ये बसवून देण्यासाठी पीडित महिला शनिवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास तिच्यासोबत खोपट येथील बसस्थानकावर गेली. आईला बसमध्ये बसविल्यानंतर पायी घरी जात असताना, मोठ्या बहिणीचा पती घनश्याम तुकाराम सितापराव उर्फ विन्या याने तिला रस्त्यात अडवले. आरोपीने तिला जवळ ओढून मोबाईल नंबर मागितला. माझे तुझ्यावर किती प्रेम आहे, तुला माहित आहे. तु बोलत नाहीस याचा मला खुप त्रास होतो, असे बोलून आरोपीने तिचा विनयभंग केला.
या प्रकारामुळे भेदरलेल्या पीडित महिलेने रात्री नौपाडा पोलिसांकडे धाव घेतली. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नौपाड्यातील आंबेडकर रोडवरील सिद्धी विनायक चाळीचा रहिवासी आहे. नौपाडा पोलिसांचे आरोपीच्या अटकेसाठी चाळीमध्ये जाऊन आले. मात्र आरोपी घरी मिळाला नाही.
पीडित महिला लग्नाच्या आधी जवळपास पाच वर्षे मोठ्या बहिणीकडे राहायची. त्यावेळीही आरोपीच्या वागणुकीवरून मोठा वाद झाला होता. कुटुंबियांनी समजूत घालून हा वाद सोडविला होता. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिचा पती एका शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरीला आहे. नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत ओऊळकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Married woman molested, brother-in-law booked in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.