तलासरीतील ग्रा.पं.वर मार्क्सवादी कम्युनिस्टांचे वर्चस्व

By admin | Published: April 19, 2016 01:48 AM2016-04-19T01:48:46+5:302016-04-19T01:48:46+5:30

या तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली

Marxist communists dominate in village panchayat | तलासरीतील ग्रा.पं.वर मार्क्सवादी कम्युनिस्टांचे वर्चस्व

तलासरीतील ग्रा.पं.वर मार्क्सवादी कम्युनिस्टांचे वर्चस्व

Next

सुरेश काटे,  तलासरी
या तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली तर भाजपाने केवळ झरी ग्रामपंचायतीवर बहुमत मिळाले तर संभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपा अपक्षाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित करू शकेल.
तलासरी तालुक्यातील १) तलासरी २) वसा ३) वडवली ४) कोचाई झ्र बोरमाळ ५) वरवाडा ६) सावरोली-अनवीर ७) डोंगारी ८) आमगाव अच्छाड या आठ ग्रामपंचायतीवर माकपने निर्विवाद बहुमत मिळविले या पैकी वरवाडा, सावरोली-अनवीर, डोंगारी, आमगाव-आच्छाड या चार ग्रामपंचायतीमध्ये मा.क.पा. ने कोणालाही शिरकाव करू दिलानाही. पण तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायतीमध्ये माकपला खातेही उघडता आले नाही.
भारतीय जनता पक्षाला झरी या एकाच ग्रामपंचायतीवर बहुमत मिळवता आले तर संभा ग्रामपंचायतीमध्ये सहा जागा मिळाल्याने अपक्षाच्या मदतीने भाजपा सत्ता मिळवू शकते. भाजपाचे आमदार पास्कल धनारे हे तलासरीचे असल्याने भाजपाने ही ग्रामपंचायत प्रतिष्ठेची केली होती पण त्याला म्हणावे तितके यश मिळविता आले नाही.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून वेगळा झालेला माजी आमदार राजाराम ओझरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बऱ्याच पैकी यश मिळवेल असे जनतेला वाटत होते पण तलासरी ग्रामपंचायतीत ३ जागा व वडवली ग्रामपंचायतीत २ जागा अशा ५ जागा सोडता तालुक्यात कोठेही यश मिळविता आले नाही.
परंतु कोणत्याही खिजगणतीत नसलेल्या शिवसेना मनसे यांनी तीन तीन जागा जिंकून आपले अस्तित्व दाखविले बहुजन विकास आघाडीने झाई- बोरीवाग ग्रामपंचायातीमध्ये आठ जागा जिंकल्या पण सत्ता स्थापनेसाठी तिला अपक्षांची मदत घ्यावी लागणार. तालुक्यातील १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित करेल, भाजप अपक्षांच्या मदतीने दोन ग्रामपंचायतीवर ताबा मिळवेल तर सूत्रकार ग्रामपंचायातीमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तेसाठी सर्वांना तारेवरची कसरत करावी लागणार झाई - बोरीवाग ग्रामपंचायातीमध्ये भाजपा व बहुजन विकास आघाडीला बहुमत नसल्याने अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, कारण अपक्षांनी सत्तेची दोरी आपल्या हाती ठेवली आहे.
तलासरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार मतदान होऊन सोमवारी तलासरी कार्यालयात मत मोजणी करण्यात आली यावेळी तलासरी तहसील कार्यालया बाहेर भाजपा, मा.क.पा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

Web Title: Marxist communists dominate in village panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.