तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा
By admin | Published: December 21, 2015 01:10 AM2015-12-21T01:10:15+5:302015-12-21T01:10:15+5:30
विक्रमगड तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण
तलवाडा: विक्रमगड तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते, जमीन या मुलभूत सुविधा प्राप्त करून द्याव्यात या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर कॉ़ गोदावरी शामराव परुळेकर मार्क्सवादी विचारमंचच्या तालुका कमिटीतर्फे मोर्चा नेण्यात आला. या तालुक्याच्या निर्मितीस आज १६ वर्षाचा काळ लोटलेला आहे़ तरीही आदिवासी गाव पाडयातील नागरीक विविध सुविधांपासुन वंचित आहेत़
येथील आदिवासीं वनवासींना ते कसित असलेले वनपट्टे मिळावेत म्हणून वनदावे दाखल करुनही त्याना न्याय मिळत नसल्याने त्यांचेकडून संताप व्यक्त केला जात आहे़ ज्यांना जमीन मिळाली ती तुटपुंजी आहे़ त्यामुळे कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार जमीन नांवे झाली पाहीजे़
रोजगारासाठी स्थानिक प्रशासनाकडून आतापासूनच कामांचा आराखडा तयार करुन त्वरीत कामे सुरु झाली पाहिजेत. प्रत्येकाच्या कुटुंबाला विभक्त व पिवळे रेशनकार्ड दिले गेले पाहिजे.
आरोग्य विभागातील रिक्त पदेभरुन त्यांना ग्रामीण रुग्णालयासह इतर आरोग्य केंंद्रांत योग्य सुविधा पुरविल्या जाव्यात, एमआयडीसी सुरु करावी आदी विविध १४ मागण्यांचा समावेश असलेल निवेदन या वेळी देण्यात आले. मोर्चामध्ये कॉ़ परशुराम चव्हाण, कॉ. सजोत राउत, कॉ़ बळीराम चौधरी, कॉ़ राजेंद्र परांजपे, कॉ़ हरीभाउ वरठा आदिनी मार्गदर्शन केले़ तर यामार्चामध्ये असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़