नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

By admin | Published: May 1, 2017 06:11 AM2017-05-01T06:11:07+5:302017-05-01T06:11:07+5:30

भिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे.

MASCH engine for angry boxes | नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

Next

रोहिदास पाटील / अनगाव
भिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे. मनसेकडून मागील पाच दिवसात ५० जणांनी अर्ज नेले आहेत. अन्य पक्षातील अनेक इच्छुकांनी संपर्क साधला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास मनसे उमेदवारी देईल. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे अन्य पक्षांना धक्का देईल असा दावा जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. जिथे मनसेचा उमेदवार नसेल तेथे मनसे अपक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत मनसे कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. रविवारी झालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्ष कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भाजपा, शिवसेना समाजवादी, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे. त्यांना सहा मे रोजी उमेदवारी जाहीर करून धक्का देणार असल्याची माहिती शहरअध्यक्ष प्रदीप बोडके व अफसर खान यांनी दिली.
मनसेने ५० अर्जांचे वाटप केले आहे. मनसेची ताकद शहरात आहे. निवडणूक प्रचाराकरिता मनसेचे नेते बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या सभा होणार असल्याची माहिती शहरसचिव शैलेश करले यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हाच मुद्दा
रविवारपासून प्रभागानुसार बैठकांवर भर देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव यांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हा प्रचाराचा प्रमुख मुद्द असेल असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी, गटारे, करमूल्यांकनामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने सावळागोंधळ झाला आहे. या सर्वांची माहिती मतदारांना देण्यात येणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आघाडीसाठी स्थानिकांची नकारघंटा
 पंकज रोडेकर / ठाणे
भिवंडी महापालिकेत सध्या एक नंबरचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी अशी आघाडी व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत नकारघंटा सुरू केली आहे. आघाडी न केल्यास काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भिवंडी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी करून त्यामधून उमेदवार निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. याचदरम्यान, भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे अपयश लक्षात घेता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे.
 
फायदा पाहून निर्णय

स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आघाडी करण्यास नकार असल्याने भिवंडीत आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या पक्षाच्या आघाडीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून तो किती फायद्याचा आहे हे पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: MASCH engine for angry boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.