भिवंडीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दल व नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

By नितीन पंडित | Published: April 15, 2023 04:50 PM2023-04-15T16:50:58+5:302023-04-15T16:51:35+5:30

अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासह मदतकार्य सुरू केले.

Massive fire at a clothing shop in Bhiwandi; A major accident was averted by the vigilance of the fire brigade and citizens | भिवंडीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दल व नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

भिवंडीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दल व नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

googlenewsNext

भिवंडी - शहरातील नागाव परिसरात असलेल्या तीन मजली आलिया कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळ मजल्यावरील कपड्याच्या दुकानात शनिवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक होत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासह मदतकार्य सुरू केले. ही रहिवाशी इमारत असल्याने व सध्या रमजान महिना सुरू असल्याने या इमारतीमधील बहुसंख्य कुटुंबीय सकाळच्या सेहरीसाठी जागे होते. त्यामुळे या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या मदतीने इमारतीतील सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दल सतर्क होत अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारती मधील गॅस सिलेंडर बाहेर काढून ठेवले. सुमारे दोन तासांनी या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.दरम्यान आगीचे कारण अजूनही समजले नसून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Massive fire at a clothing shop in Bhiwandi; A major accident was averted by the vigilance of the fire brigade and citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.