भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे ऑटो पार्टसच्या दुकानाला भीषण आग
By नितीन पंडित | Updated: February 23, 2025 23:13 IST2025-02-23T23:12:56+5:302025-02-23T23:13:14+5:30
Bhiwandi Fire News: भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या ऑटो पार्टच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे ऑटो पार्टसच्या दुकानाला भीषण आग
- नितीन पंडित
भिवंडी - शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या ऑटो पार्टच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केल्याने नंतर काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.तोपर्यंत आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी हॉस्पिटल,हॉटेल व समोर पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.या आगीत कोणतीही जीवित हानी नाही झाली नसून आगीचे नेमकी कारण समजू शकले नाही. रस्त्याच्या बाजूलाच आग लागल्यामुळे वंजारपट्टी नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.