मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:20 AM2022-05-23T05:20:25+5:302022-05-23T10:03:15+5:30

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सुमारे साडे तीन तासानी ही आग आटोक्यात आणली.

massive fire in Kothari compound area at thane manpada fortunately no survivors were harmed | मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

googlenewsNext

ठाणे: २७ एकर, कोठारी कंपाउंड, टिकुजी-नी-वाडी जवळ, मानपाडा भागात टाटा मोटर्स  सर्विसिंग सेंटर समोर  खोडियार स्टेशनरी आणि झेरॉक्स, क्लीन अँड साइन सोलुशन या गोडाउनमध्ये स्टेशनरी वस्तू व साफसफाई करण्याच्या वस्तूंना रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सुमारे साडे तीन तासानी ही आग आटोक्यात आणली.  

आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर  पोलिसासह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन, एक वॉटर टँकर तसेच एका जम्बो वॉटर टँकरसह उपस्थित होते. सुदैवाने, या घटनेत  कोणतीही जीवित हानी तसेच कोणालाही दुखापत झाली  नाही.   सोमवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास ही आग  पूर्णपणे नियंत्रणात आल्याची  माहिती सूत्रांनी दिली. या आगीमध्ये गोदामातील पत्र्यांचे तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात झाले.
 

Read in English

Web Title: massive fire in Kothari compound area at thane manpada fortunately no survivors were harmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.