बाप्पांच्या विसर्जन होणाऱ्या मासुंदा तलावाला बॅनरबाजीचा विळखा, महापालिकेचे दुर्लक्ष

By अजित मांडके | Published: September 5, 2022 05:11 PM2022-09-05T17:11:45+5:302022-09-05T17:13:33+5:30

ठाण्याची चौपाटी म्हणून मांसुदा तलावाची ओळख आहे.

Masunda Lake is a mess of banners, but the Thane municipality ignores it | बाप्पांच्या विसर्जन होणाऱ्या मासुंदा तलावाला बॅनरबाजीचा विळखा, महापालिकेचे दुर्लक्ष

बाप्पांच्या विसर्जन होणाऱ्या मासुंदा तलावाला बॅनरबाजीचा विळखा, महापालिकेचे दुर्लक्ष

googlenewsNext

अजित मांडके (ठाणे)

ठाणे : एकीकडे कोरोनाचे विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणोशोत्सव मोठय़ा थाटा माटात साजरा होत आहे. तर गणरायाच्या विसजर्नासाठी ठाण्याची चौपाटी म्हणून ओळख असलेला मासुंदा तलावही सज्ज झाला आहे. मात्र याठिकाणी देखील राजकीय पक्षांच्या मंडळींनी बॅनरबाजी करुन या चौपाटीची पुर्ती वाट लावल्याचे दिसत आहे. त्याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तलावाच्या चोहो बाजूंनी विविध राजकीय पक्षाच्या मंडळींचे बॅनर लावण्यात आल्याने तलावाचे सौंदर्य लपून गेले असून विद्रुपीकरणात या बॅनरबाजीमुळे भर पडल्याचे दिसत आहे.               

ठाण्याची चौपाटी म्हणून मांसुदा तलावाची ओळख आहे. त्यात मागील काही वर्षात या तलावाने स्मार्टसिटीच्या माध्यमातून कात टाकली आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्य आणखीनच खुलुन गेले आहे. रात्रीच्या सुमारास येथील नजारा अनेकांना येथे येण्यास भाग पाडत आहे. मात्र मागील काही दिवसापासून या तलावाचे सौंदर्य राजकीय बॅनरबाजीमुळे पुर्ते कांळवडल्याचे दिसत आहे. गणपती विसजर्नसाठी अनेक भक्त व त्यांच्यासोबत अनेक घरची मंडळी याठिकाणी येत आहेत. परंतु याठिकाणी लागलेल्या बॅनरचा त्यांना देखील त्रस होतांना दिसत आहे. तलावाच्या चोहोबाजूंनी सध्या माजी नगरसेवक तसेच इतर राजकीय पक्षांच्या मंडळींनी बॅनर लावले आहेत. त्यात गणोशोत्सवाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा असा आशय दिसत आहे. या बॅनरबाजीतही माजी नगरसेवकांची चढाओढ या ठिकाणी लागल्याचे दिसत आहे. या बॅनरकडे बघून ठाणोकर जसे यांच्यात झोळीत मतांचा जोगावा टाकणार आहे की काय? अशी शंका या बॅनरकडे पाहिल्यास निर्माण होत आहे.

ठाण्याची चौपाटी सध्या या बॅनरबाजीमुळे पुर्ती झाकली गेली असून बॅनरच्या बाजूला दुसरा बॅनर अशा पध्दतीने यात चढाओढ लागल्याचे दिसत आहे. मात्र अनाधिकृत बॅनरबाजीच्या विरोधात आक्रमक होणा:या ठाणो महापालिकेला हे बॅनर दिसत नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. इतर ठिकाणी लावलेले बॅनर अगदी अध्र्या तासात काढल्याचे अनेक उदाहरणो दिसत आहेत. मात्र मासुंदा तलावाच्या ठिकाणी लागलेल्या अनाधिकृत बॅनरमुळे अख्खा तलावाच झाकला गेल्याचे पालिकेला दिसत नाही का? असा सवालही केला जात आहे.

Web Title: Masunda Lake is a mess of banners, but the Thane municipality ignores it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.