तीन टप्प्यात मिळणार मातृवंदन योजनेचे पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:38+5:302021-09-04T04:47:38+5:30
दुसरा टप्पा- गरोदरपणात मातेच्या सहा महिन्यात म्हणजे १८० दिवस पूर्ण झाल्यास, किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केली असल्यास - दोन ...
दुसरा टप्पा- गरोदरपणात मातेच्या सहा महिन्यात म्हणजे १८० दिवस पूर्ण झाल्यास, किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केली असल्यास - दोन हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात मिळणार.
तिसरा टप्पा- प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद व बाळाचे १४ आठवड्यापर्यंत लसीकरण पूर्ण केल्याची नोंद माता बालक संरक्षण कार्डवर केली असल्यास तिसऱ्या टप्प्याचे दोन हजार रुपयेही बँक खात्यातच जमा होणार.
.......
या रकमेच्या लाभाच्या पात्रतेचे निकष...
१) सर्व स्तरावरील पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलांना लाभ घेता येतो
२) पहिला, दुसरा व तिसरा लाभ घेण्याकरिता लाभार्थी व पतीचे आधारकार्ड व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, बाळाचा जन्मदाखला व माता बाल संरक्षण कार्ड आदी निकष निश्चित केले आहेत.
............
* अपात्रतेचे निकष -
ज्या गरोदर माता राज्य अथवा केंद्र सरकारचे शासकीय कर्मचारी असल्यास किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयात कार्यरत आहेत, अशा मातांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्याने घेत असल्यास त्यांनाही हा लाभ मिळणार नाही.
लाभासाठी कोठे करायचा संपर्क...
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी जवळच्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, हेल्थ पोस्ट इत्यादी ठिकाणी संपर्क करावा.
........
गरोदरपणात मातेसह शिशु सुदृढ राहावे व मातेस सकस आहार घेता यावा, कुपोषणावर मात करता यावी आणि अंशत: बुडित मजुरी लाभार्थींना मिळावी आदींसाठी ही योजना केंद्र शासनाकडून राबविली जात आहे. सध्याच्या या सप्ताह कालावधीत प्रथम खेपेच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. दुसऱ्या व तिसऱ्या लाभाचे थकीत लाभार्थींची नोंदणी करण्यात येईल. यासाठी या कार्यक्रमाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करून सर्वसामान्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे