संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा महापौर-आयुक्तांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:12+5:302021-07-01T04:27:12+5:30
ठाणे : कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. तिला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण ...
ठाणे : कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. तिला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण ताकदीनिशी व सर्व सुविधांनी सज्ज झाली असल्याची माहिती बुधवारी झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, अतिरिक्त खाटांची तयारी, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पार्किंग प्लाझा येथे १०० बेडची व्यवस्था केली असून ५० बेड ऑक्सिजन व ५० बेड आयसीयू व २५ व्हेंटिलेटर बेड आहेत. तसेच लहान मुलांबरोबर आईला राहणे देखील आवश्यक असल्याने त्याबाबतही व्यवस्था केली आहे. लहान मुलांसाठी लागणारी औषधे व इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध असून कंट्रोल रुमच्या एकाच नंबरवर एकावेळी २० फोनकॉल्स स्वीकारले जातील अशी यंत्रणा सज्ज केली आहे.
तसेच जर रुग्णांची संख्या वाढल्यास खाजगी कोविड रुग्णालयातील ८० टक्के बेड महापालिकेच्या ताब्यात घेऊन योग्य नियोजन करणेबाबतच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.