महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:57 PM2020-02-26T22:57:09+5:302020-02-26T22:57:20+5:30

सदस्यत्व रद्द करणार; भाजप, शिवसेना, काँग्रेसचा इशारा

Mayor, Deputy Mayor Warning Action against Councilor Rebels in Elections | महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

Next

मीरा रोड : भाजपच्या मॉरस रॉड्रिक्स, परशुराम म्हात्रे, वैशाली रकवी आणि अश्विन कासोदरिया या चार नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने, तर विजय राय गैरहजर राहिल्याने त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई तातडीने सुरू करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. निवडणुकीत भाजपला सहकार्य करणाºया शिवसेना नगरसेविका अनिता पाटील, दीप्ती भट आणि काँग्रेसच्या सारा अकरम या तिघींचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा सेना आणि काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे भूमिगत नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांनी मंगळवारी सभागृहात हजेरी लावून महाविकास आघाडीला मतदान केले. या दोन्ही नगरसेवकांनी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमधील अंतर्गत नाराजी तसेच इच्छुकांमधील मतभेदांवरून या निवडणुकीत चमत्कार घडवण्याच्या शिवसेना नेत्यांच्या वल्गनाच ठरल्या. या निवडणुकीत सेनेच्या शिर्केंना केवळ ३६ मतेच मिळाल्याने सर्वांनी काढता पाय घेतला.

भाजपने हाणून पाडले विरोधकांचे डावपेच
महापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मर्जीतील रूपाली शिंदे-मोदी तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांची नावे आघाडीवर होती. पण, भाजपच्या ४५ नगरसेवकांनी जसनाळे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे आधीच नाराजी, त्यात फुटीची चिन्हे पाहून चव्हाणांनी स्वत:च्या हातात सूत्रे घेतली. नगरसेवकांचे पहिल्यांदाच व्यक्तिगत मत विचारले गेल्याने हसनाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक ध्रुवकिशोर यांचा पत्ता कापल्याने त्यांचेच दुसरे समर्थक गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह, प्रभात पाटील, रीटा शाह यांच्यासह अन्य इच्छुकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता. त्यातच शिवसेना आणि गीता जैन यांच्याकडून भाजपला सुरुंग लावण्याची भीती असताना चव्हाण यांनी विरोधकांची खेळी यशस्वी होऊ दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून सेना-काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा जोरदार प्रयत्न झाला. सेना-काँग्रेसच्या तीन नगरसेविका शेवटपर्यंत बेपत्ता राहिल्या.

गीता जैन शिवसेनेसोबत : आमदार गीता जैन यांना भाजप नेतृत्वाकडून सातत्याने पालिकेतील सत्ता सहभागात केवळ पोकळ आश्वासनेच मिळाल्याने त्यांनी शिवसेनेची कास धरल्याचे आजच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. भाजप नेतृत्व सतत मेहतांना झुकते माप देत असल्याने त्या संतापल्या होत्या. गीता यांनी त्यांच्या समर्थक भाजपतील चार नगरसेवकांसह शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे पालिका व शहरातील राजकारणात आता गीता जैन या शिवसेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे भाजपसमोर स्वत:चे वर्चस्व राखण्याचे आव्हान राहणार आहे.

अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त
नगरसेवकांची पळवापळवी व त्यावरून झालेल्या तक्रारी तसेच नरेंद्र मेहतांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होऊन भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी मेहतांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली तक्रार यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत ठाणे ग्रामीण पोलिसांनी कधी नव्हे तो तब्बल साडेपाचशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्यासह उपअधीक्षक शशिकांत भोसले तसेच अनेक अधिकारी जातीने बंदोबस्तासाठी तैनात होते. मुख्यालयाचे मागचे प्रवेशद्वार बंद करून पुढील प्रवेशद्वाराने केवळ ओळखपत्र असणाºया आवश्यक लोकांनाच मुख्यालयात प्रवेश दिला जात होता.

सर्वांना सोबत घेऊन काम करणार - महापौर
नवनिर्वाचित महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. या शहराने मला खूप काही दिले असून, महापौरपद मिळाल्याने जनतेचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन. त्याला तडा जाईल, असे काम होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Mayor, Deputy Mayor Warning Action against Councilor Rebels in Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.