महापौर मॅरेथॉनला प्रायोजक मिळेनात

By Admin | Published: July 29, 2015 12:07 AM2015-07-29T00:07:29+5:302015-07-29T00:07:29+5:30

मागील २५ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा

Mayor Marathon gets sponsor | महापौर मॅरेथॉनला प्रायोजक मिळेनात

महापौर मॅरेथॉनला प्रायोजक मिळेनात

googlenewsNext

- अजित मांडके,  ठाणे
मागील २५ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रथमच २६ व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा ही संपूर्णपणे प्रायोजकत्वाच्या माध्यमातून साकारली जाणार असून यासाठी खाजगी इव्हेंट मॅनेजरची मदत घेतली जाणार आहे. परंतु काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेसाठी अद्यापही प्रयोजक मिळत नसल्याने स्पर्धेची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. पालिकेने घातलेल्या अटी, शर्र्तींंमुळेच पालिकेला प्रायोजक मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्टेज, मंडप व इतर साहित्य पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त्याला मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी वादग्रस्त ठरली आहे. मागील वर्षी तर या स्पर्धेवर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेऊन आतापर्यंत झालेल्या स्पर्धांवर झालेल्या खर्चाचे आॅडिटही करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तसेच काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षी स्थानिक पातळीवरील खेळांडूसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सुमारे ३५ हजारांच्या आसपास खेळाडू सहभागी होत असतात. मागील वर्षी या स्पर्धेसाठी पालिकेने ४० लाखांची आर्थिक तरतूद केली होती. परंतु, ती देखील काहीशी अपुरी ठरल्याने पालिकेने मागील वर्षीच प्रायोजकांचा आसरा घेतला होता. परंतु आता या संपूर्ण स्पर्धेचा खर्चाचा भारच पेलवणे शक्य नसल्याने पालिकेने प्रायोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असून इव्हेंट मॅनेजरवर या संपूर्ण स्पर्धेची जबबादारी सोपवून त्यांनाच प्रायोजक शोधण्याचे काम देण्यात येणार आहे. या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून या स्पर्धांना मोठी उंची मिळवून देऊन त्यांना कार्पोरेट लेव्हलवर नेण्याचा मानस असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रायोजक मिळत नसल्याने या स्पर्धाचे पुढील कार्यक्रमही निश्चित होण्यास अडचणी येत असून मागील वर्षी ९ आॅगस्ट रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. परंतु आता जुलै महिना संपत आला तरी देखील या स्पर्धेबाबत अद्यापही प्रशासन आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेत आहे. प्रायोजकांना पालिकेने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

जाहीरात डिझायनिंग व फ्लेक्स प्रिटींगच्या अटी
पाणी व एनर्जी ड्रींकचे बॅनर्स १० बाय ६ फुट असावेत, स्टेज व मंडप बाबत १० बाय ३० फुटांचा बॅकड्रॉप असावा, आडव्या कमानींवर पदाधिकारी आणि उजव्या कमानींवर प्रायोजकांचे फोटो असावेत, जाहीरात करण्याचे अधिकारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत असणार आहेत, किमंतीच्या अनुषगांने प्रायोजकांना जागा बहाल केल्या जातील.

इलेक्ट्रॉनिक चिप : २१ किमी पुरुष व १५ किमी महिला गटाच्या स्पर्धांच्या अचूक वेळेच्या नोंदीच्या नियंत्रणासाठी टाईमिंग चिपची प्रणाली आवश्यक

टी - शर्ट टोपी पुरविण्याकरीताच्या अटी
महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना टी शर्ट व टोपी पुरविणे, पंच, पायलट, अधिकारी, स्वयंसेवक, निरिक्षक, पर्यवेक्षक यांना देखील हे साहित्य पुरविणे, टी शर्ट आणि टोपीवर पुढील बाजूस डाव्याबाजूला मॅरेथॉनचा आणि मागील बाजूस जाहीरात असावी. विशेष म्हणजे या पैकी पुरस्कर्ता कोणत्याही एका बाबीकरीता अथवा सर्व बाबींकरीता पुरस्कर्ता होऊ शकतो. परंतु यापैकी इतर काही अथवा संपूर्ण स्पर्धेचा खर्च उचलण्यास पुरस्कर्ता तयार असल्यास विशेष परवानगी घेऊन मान्यता देण्याचा घाटही पालिकेने घातला आहे. परंतु प्रायोजकत्व हे केवळ वस्तू स्वरुपातच स्वीकारण्यात येतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

जाहीरात डिझायनिंग व फ्लेक्स प्रिटींगच्या अटी
विशेष म्हणजे प्रायोजकत्व शोधतांना छोट्या बाबींपासून मोठ्या बाबींवर होणारा सर्वच खर्च हा प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पालिका घेणार आहे. यामध्ये चेस्ट नंबर छपाई पासून पाणी, ड्रींक, इतर साहित्य पुरविणे, स्टेज, मंडप, चषक, स्मृती चिन्हे आदी देखील यामाध्यमातून घेतले जाणार आहे.
प्रायोजक मिळावा म्हणून पालिकेने निविदा मागविली होती, परंतु पालिकेने घातलेल्या अटी, शर्तींमुळेच पालिकेला प्रायोजक मिळणे अवघड झाल्याने पालिकेने पुन्हा या निविदेला मुदतवाढ दिली आहे.

१० गटात होणार स्पर्धा...
पुरुष२१ किमीराज्यस्तरीय
महिला१५——
१८ वर्षाखालील मुले १० किमी——
१५ वर्षाखालील मुले ५जिल्हास्तरीय
१५ वर्षाखालील मुली५——
१२ वर्षाखालील मुले५——
१२ वर्षाखालील मुली३ ——
जेष्ठ नागरीक पुरुष५०० मीटर——
जेष्ठ नागरीक महिला५०० मीटर——
रन फॉर फन-————

Web Title: Mayor Marathon gets sponsor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.