महापौर चषक सायकल स्पर्धा आज ठाण्यात रंगणार
By admin | Published: February 7, 2016 12:36 AM2016-02-07T00:36:36+5:302016-02-07T00:36:36+5:30
ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कला-क्र ीडा महोत्सवांतर्गत ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता तीनहात नाका येथून सुरू होणार
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कला-क्र ीडा महोत्सवांतर्गत ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता तीनहात नाका येथून सुरू होणार असल्याची मांिहती महापौर संजय मोरे यांनी दिली. सायकल स्पर्धेच्या कालावधीत या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
महिला व पुरुष (खुली) ७० किमीची सायकल स्पर्धा असून पुरुष व महिला (हौशी) २२ किमीची सायकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी शनिवारी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
महिला व पुरुष (खुल्या) ७० किमी सायकल स्पर्धेचा प्रारंभ तीनहात नाका (उजवीकडील रस्ता) येथून होणार आहे. एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाइज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोलपंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस, डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉइंट, कापूरबावडी उड्डाणपूल, ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वरून सरळ, नितीन कंपनी उड्डाणपुलामार्गे परत तीनहात नाकामार्गे अशा तीन फेऱ्या पूर्ण करतील. अंतिम रेषा ही शेवटच्या फेरीत तीनहात नाका असणार आहे.
वाहतुकीत बदल दरम्यान, सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत या कालावधीत या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. मुंबईकडून नाशिक व घोडबंदरच्या दिशेने, माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ज्युपिटर हॉस्पिटलच्या पुढे उड्डाणपुलावर चढणी ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मुंबईकडून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कॅडबरी ब्रिज व माजिवडा ब्रिजखालून इच्छितस्थळी जातील. घोडबंदर व बाळकुमकडून मुंबई व नाशिककडे माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उड्डाणपुलाच्या चढणीच्या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग घोडबंदरकडून मुंबई व नाशिककडे माजिवडा उड्डाण ब्रिजवरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही सदर ब्रिजखालून कापूरबावडी सर्कल, गोल्डन क्रॉस व माजिवडा येथून इच्छितस्थळी जातील. घोडबंदर व बाळकुमकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून तुळशीधाम, वसंत विहारकडे जाणाऱ्या अथवा यू टर्न घेऊन जाण्यास तत्त्वज्ञान सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्गे ही वाहने सरळ कापूरबावडी सर्कल उड्डाण ब्रिजच्या खालून उजव्या बाजूने यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जातील. ठाणे-मुंबईकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून यू-टर्न घेऊन कापूरबावडी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नल येथे यू-टर्न घेऊन जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. तुळशीधाम, वसंत विहारकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून कापूरबावडी सर्कल, ठाणे-मुंबईकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नलवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नल येथून वळून घोडबंदरमार्गे मानपाडा ब्रिजखालून उजव्या बाजूने वळून इच्छितस्थळी जातील. नाशिककडून मुंबईच्या दिशेने माजिवडा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस रुस्तमजीच्या पुढे उड्डाणपुलावर चढणी ठिकाणी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहने ही ब्रिजच्या खालून इच्छितस्थळी जातील.
हौशी सायकलपटूंसाठीही स्पर्धा
या स्पर्धेचा प्रारंभ तीनहात नाका, एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाइज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोलपंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉइंट, कापूरबावडी उड्डाणपूल, ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वरून सरळ, नितीन कंपनी उड्डाणपूल असा मार्ग असून अंतिम रेषा ही तीनहात नाका आहे.