ठाण्यात रंगणार १८ जानेवारीला महापौर कुस्ती स्पर्धा; सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:09 AM2020-01-15T01:09:01+5:302020-01-15T01:09:17+5:30
नरेश म्हस्के यांची माहिती : विजेत्यांना मिळणार अनेक रोख बक्षिसे
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कला क्र ीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. आर्य क्र ीडा मंडळ, महागिरी कोळीवाडा येथे होणाºया कुस्ती स्पर्धेतील पैलवानांना प्रोत्साहन देऊन उत्साह वाढविण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिक ा विविध खेळातील खेळाडूंना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. कुस्ती हा आपल्या मातीतील खेळ. या खेळाची माहिती भावी पिढीला व्हावी आणि त्याबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाºया कुस्ती स्पर्धेचा समारोप १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्र ीडा विभागाबरोबरच उपमहापौर पल्लवी कदम,स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे,नगरसेविका नम्रता कोळी यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.
जिल्हास्तरीय पुरु ष व महिला गटासाठी प्रथम दहा हजारांचे पारितोषिक व द्वितीय ७,५०० रूपये व तृतीय, चतुर्थ क्र मांकासाठी ३ हजारांचे पारितोषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पुरूष व महिला असे ३०० जणांना आतापर्यंत आपल्या नावाची नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापौरांनी केले.
सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदा
राज्यस्तरीय असलेल्या या स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाºया पैलवानाला प्रथम क्र मांकांचे १,२५,००० रु पये व ठाणे महापौर केसरी हा किताब, चांदीची गदा व सन्मान पट्टा प्रदान करण्यात येणार आहे. तरी द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्र मांकास अनुक्र मे ७५००० रु पये, ६०,००० रु पये व ४०,००० हजारांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.
महिलांना मिळणार ७५ हजार रोख
राज्यस्तरीय महिला गटासाठी प्रथम क्र मांकाचे ७५,००० रु पये व सन्मान पट्टा देण्यात येणार आहे. तर द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्र मांकासाठी अनुक्र मे ४०,०००, २०,००० व १०,००० हजारांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाईल.