महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 05:10 PM2017-10-10T17:10:25+5:302017-10-10T17:10:40+5:30

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे.

Mayor your ... leave the bulldozer, the bike does not turn up - Bhausaheb Chaudhary | महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी

महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी

googlenewsNext

डोंबिवली: शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय होते. यासंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकरांनी तीन महिन्यांपूर्वी वस्तूस्थिती बघितली होती, त्यावर तातडीची उपाययोजना म्हणुन बुलडोझर फिरवणार असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात तीन महिन्यात बुलडोझर सोडा पण समस्या सोडवण्यासाठी साधी सायकलही फिरकलेली नाही. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी अशा आशयाचे खरमरीत पत्र देवळेकरांना लिहीले आहे.
फेरिवाला प्रश्न जटील झाला असून त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमधील वृत्ताचा आधार घेत चौधरी यांनी देवळेकरांना पत्र दीले. गणेशोत्सवात या ठिकाणी आग लागली होती, त्या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या गाड्या जाण्यासाठी फेरिवाल्यांसह दुकानांच्या अतिक्रमणामुळे अडचण झाली होती याचीही आठवण त्यांनी करुन दिली.

स्टंट नको कार्यवाही करा
फेरिवाला प्रश्नावरुनच भाजपच्या नगरसेवकांनी ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना धारेवर धरले. मंगळवारी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत स्विकृत नगरसेवक राजन सामंत, संदीप पुराणिक, राजन आभाळे, फ प्रभाग समितीच्या सभापती खुशबु चौधरी, माजी सभापती मुकुंद पेडणेकर आदींच्या शिष्ठमंडळाने कुमावत यांची भेट घेत त्यांना फेरिवाले हटवण्यासंदर्भात चर्चा केली. स्टंट नको कार्यवाही कायमस्वरुपि हवी अशी मागणी सभापती चौधरी यांनी केली. तर सारखे का यावे लागते असा सवाल सामंत यांनी केला. या शिष्ठमंडळाने रेल्वे स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांचीही भेट घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणीदरम्यान केलेल्या सूचनांनूसार उद्घोषणा यंत्रावरुन मधल्या पादचारी पुलाचा जास्त वापर करावा असे आवाहन सुरु आहे. कल्याणसह मुंबईकडील पादचारी पूलावर फेरिवाले नकोत त्याची अंमलबजावणी झाली असल्याचे संदीप पुराणिक म्हणाले.
दरम्यान, स्कायवॉकवर महापालिकेच्या कर्मचा-यांची ड्यूटी रात्री ९ पर्यंत असते.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत फेरिवाले येत असतील तर त्याबद्दल माहिती घ्यावी लागेल. त्यातच या प्रभागात फेरिवाला कारवाई पथक प्रमुख नाही, कर्मचा-यांचा तुटवडा असल्याने गंभीर समस्या असल्याचे स्पष्टीकरण प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिले.

 

Web Title: Mayor your ... leave the bulldozer, the bike does not turn up - Bhausaheb Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.