स्थायी सभापती निवडणुकीसाठी आता महापौरांचा अट्टाहास
By admin | Published: April 26, 2017 12:23 AM2017-04-26T00:23:29+5:302017-04-26T00:23:29+5:30
एकीकडे स्थायी समितीच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाचा निकाल येणे प्रलंबित असताना दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्थायी समिती सभापती
ठाणे : एकीकडे स्थायी समितीच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाचा निकाल येणे प्रलंबित असताना दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी महापालिकेकडे अट्टाहास धरला आहे. या संदर्भात त्यांनी सचिवांना पत्र पाठवून निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे आणखी नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या चाव्या मिळविण्याचे गणित शिवसेनेकडून चुकल्यामुळे पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ३१ (३) ए च्या आधारे स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसचा नसलेला गट देखील आपल्या गटात समाविष्ट करुन त्यानुसार नावे जाहीर केली होती.
शिवसेनेने सर्वसाधारण सभेमध्ये स्वत:च्या नऊ सदस्यांची निवड केली. तर राष्ट्रवादीच्या चार आणि भाजपाच्या तीन सदस्यांची निवड केली. ही निवड बेकायदा असल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे स्थायी समिती पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)