एमसीएच्या शेफने ठाण्यातील दुकानातून चोरला लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 08:50 PM2019-11-25T20:50:10+5:302019-11-25T21:01:02+5:30

ठाण्यातील एका कॉफी शॉपमधून लॅपटॉपची चोरी करणाऱ्याच्या शोधात ठाणे पोलीस एमसीए अर्थात महाराष्टÑ क्रिकेट क्लबच्या कॅन्टीनपर्यंत पोहचले. या कॅन्टीनमधील शेफनेच हा लॅपटॉप चोरल्याचे उघड झाल्यानंतर त्याला या ५५ हजारांच्या लॅपटॉपसह नौपाडा पोलिसांनी अटक केली.

MCA chef steals laptop from Thane shop | एमसीएच्या शेफने ठाण्यातील दुकानातून चोरला लॅपटॉप

नौपाडा पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीचोरीनंतर झाला होता पसारलॅपटॉपही केला हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाड्यातील लॅपटॉप चोरीप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट क्लब (एसीए) मधील देवसिंग सिंग (२७, रा. उत्तराखंड) या शेफला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीनहातनाका येथील ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपमध्ये देवसिंग हा पूर्वी नोकरीला होता. त्याने या दुकानातील महत्त्वाच्या नोंदी असलेला ५५ हजारांचा नामांकित कंपनीचा लॅपटॉप चोरून पलायन केल्याची घटना १० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपच्या मालक रंजना नंबियार (३१) यांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, सुनील राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंग याची माहिती काढली. तो बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘एमसीए’च्या कॅन्टीनमध्ये शेफचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २४ नोव्हेंबर रोजी रात्री या पथकाने ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्याने या चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अटक केल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

Web Title: MCA chef steals laptop from Thane shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.