श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:35+5:302021-02-17T04:47:35+5:30
ठाणे : श्रमिक जनता संघ या राष्ट्रीय युनियनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत युनियनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा ...
ठाणे : श्रमिक जनता संघ या राष्ट्रीय युनियनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत युनियनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची पुनर्नियुक्त करण्यात आली. तर ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांच्यावर युनियनच्या सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मध्यप्रदेशचा खरगोन जिल्ह्यातील सत्राटी येथील सेंच्युरी यार्न,डेनिम कंपनीजवळ रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेच्या सुमारे एक हजार सदस्य प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. यावेळी उपाध्यक्षपदावर डाॅ संजय मंगला गोपाळ, ॲड. नितीन शिवकर, ॲड. विजय शर्मा, सचिव पदावर सुनील कंद, संजय चौहान आणि खजिनदार पदावर अविनाश नाईक यांना निवडण्यात आले. या व्यतिरिक्त ठाणे मुंबई महाराष्ट्रासह मध्यप्रदेश येथील विविध कंपनीतील कामगार, कंत्राटी कामगार व मासळी विक्रेता आदी विविध क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडण्यात आले. संघटनेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. अरुण गडकरी, ॲड. रवींद्र नायर आणि ॲड. प्रत्युष मिश्रा यांची निवड करण्यात आली. शेतकरी- कामगार- श्रमिक यांची एकजूट करून सरकार व काॅर्पोरेटिकरण षडयंत्र विरोधी संघर्ष, लढा तीव्र करण्याबाबत संकल्प यावेळी करण्यात आला. ४४ कामगार कायदेऐवजी चार कोड या कामगारविरोधी सरकारच्या भूमिकेचा निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांसह आंदोलन उभारणीसाठी निर्धार करून संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध दहा ठराव देखील या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
---------
फोटो मेलवर