'डॉक्टर आपल्या दारी' अभियानांर्गत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पोलिसांची वैद्यकीय तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:15 PM2020-06-11T17:15:45+5:302020-06-11T17:19:07+5:30
कोविड वॉरिअर्स असलेल्या पोलीसांना कोरोनाची लागण व त्यातून होणारे मृत्यू पाहता पोलीसांच्या प्राथमिक तपासणीची मिशन पोलीस स्टेशन अशी मोहीम भारतीय जैन संघटना , देश अपनाए फाऊंडेशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे सुरु केलेली आहे .
मीरारोड - संस्थांनी मिळून सुरु केलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त पोलीस ठाण्यां मधील पोलीसांची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे . कोविड योद्धया पोलीसांच्या सुरक्षिततेसाठी मिशन पोलीस स्टेशन हि संकल्पना राबवली जात आहे . तर सुमारे साडेतीन लाख नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध उपचार केले गेले आहेत .
कोविड वॉरिअर्स असलेल्या पोलीसांना कोरोनाची लागण व त्यातून होणारे मृत्यू पाहता पोलीसांच्या प्राथमिक तपासणीची मिशन पोलीस स्टेशन अशी मोहीम भारतीय जैन संघटना , देश अपनाए फाऊंडेशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे सुरु केलेली आहे . डॉक्टर , परिचारिका आदींचे पथक मीरा भाईंदर सह मालाड, घाटकोपर, टीळकनगर, ठाणे आणि डोंबिवली अश्या सुमारे ६० पेक्षा जास्त पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.
सामान्य जनतेलाही प्राथमिक तपासणी करता यावी यासाठी महिनाभरात मीरा भाईंदर, जी-साऊथ, जी-नॉर्थ, एफ नॉर्थ, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, वांद्रे, मुलुंड, घाटकोपर, भांडुप, पवई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या भागामध्ये मोबाईल क्लिनिक सेवा सुरु केली आहे .
सुमारे ५७ डॉक्टर व ५७ पेक्षा जास्त मोबाईल दवाखाना सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ३,४६,४८५ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यातील ५,६५८ रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. क्रेडाइ-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शाह म्हणाले कि , मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या बघता वैद्यकीय सेवेवर मोठ्याप्रमाणावर ताण येत आहे. या उपक्रमा मुळे पालिकेवरचा ताण बराच कमी झाला आहे .
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, शांतीलाल मुथा म्हणाले कि , राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम सुरु असून गरजूं नागरिकांसह पालिका , शासकीय यंत्रणेला या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरू केल्या आहेत.
देश अपनाए फाऊंडेशनचे संस्थापक वल्लभ बंसाली यांनी सांगितलं की, मोबाइल व्हॅनमुळे गरीब लोकांना याचा जास्त फायदा होईल. आणि जास्तीत जास्त कोविड रुग्ण शोधण्यास मदत होईल. माजी अध्यक्ष धर्मेश जैन यांनी सांगितले कि , निसर्गसारखे चक्रीवादळ आले तरी सुद्धा आमच्या टीमने न डगमगता रुग्णाच्या सेवेला प्राधान्य दिले. या सेवेचा फायदा प्रत्येकाला व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
भारतीय जैन संघटनेतर्फे राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ एप्रिल ते आतापर्यंत १२,७०,५८७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर १५,४८२ रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्यासा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत २२७ डॉक्टरांच्या मदतीने २२७ मोबाइल क्लिनिक व्हॅनचा वापर करण्यात आला आहे.