लोकमान्य नगरच्या त्या रुग्णाच्या संपर्कातील वैद्यकीय कर्मचाऱ्यालाही झाली लागण, कळवा हॉस्पीटल मधील लेबर ओपीडी पालिकेने केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:49 PM2020-04-24T17:49:08+5:302020-04-24T17:51:20+5:30
लोकमान्य नगर भागातील मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी सुरु असतांनाच कळवा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या संपर्कातील ६० वैद्यकीय कर्मचारी आता हायरीस्कमध्ये आले असून येथील लेबर ओपीडीही बंद करण्यात आली आहे.
ठाणे : लोकमान्य नगर भागातील मृत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ६० हून अधिक नागरीकांना पालिकेने क्वॉरन्टाईन केले आहे. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयामधील महिला वैद्यकीय कर्मचारी हिला देखील आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ६० वैद्यकीय कर्मचारी देखील हायरीस्कमध्ये आले असून त्यांनाही क्वॉरान्टाइन केले गेले आहे. तसेच येथील लेबर ओपडी देखील बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी लोकमान्य नगर भागातील एका रुग्णाला उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसºया दिवशीच त्याचा मृत्यु झाला. मृत्यु नंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन केला. परंतु मृत्यु नंतर दोन दिवसांची त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे लागलीच लोकमान्य आणि सावरकर नगर, शास्त्रीनगर रविवार पर्यंत बंद करण्यात आले. तर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरीकांना पालिकेच्या माध्यमातून क्वॉरान्टाइन करण्यात आले. आता त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयातील एका वैद्यकीय सेवा देणाºया महिला कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक मााहिती समोर आली आहे. सध्या या कर्मचारी महिलेला येथील खाजगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु आता कळवा रुग्णालयातील तब्बल ६० वैद्यकीय कर्मचारी हायरीस्कमध्ये आले असून त्यांनाही आता क्वॉरान्टाइन करण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच येथील लेबर ओपीडी देखील पालिकेने बंद केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.