कै.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था 'उत्कृष्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन' पुरस्काराची मानकरी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 30, 2023 04:40 PM2023-11-30T16:40:57+5:302023-11-30T16:41:52+5:30

नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात संस्थेचा बहुमान.

Meenatai Thackeray Nursing Training Institute won the 'Outstanding Student Nurses Association' Award in thane | कै.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था 'उत्कृष्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन' पुरस्काराची मानकरी

कै.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था 'उत्कृष्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन' पुरस्काराची मानकरी

ठाणे : नाशिक येथे नुकतेच स्टुडेंट नर्सेस असोसिएशनचे (SNA)30 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. 'नर्सिंग विद्यार्थी सक्षमीकरण : संभावना आणि आव्हाने' असे ब्रीदवाक्य असलेल्या या अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेस भारतातील 'उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग असोसिएशन युनिट' हे पारितोषिक प्राप्त झाले असून एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ट्रेंड नर्सेस असोशिएशन ऑफ इंडिया दिल्ली शाखा यांच्या तर्फे त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली सभागृह नाशिक येथे स्टूडेंट नर्सेस असोसिएशनचे 30 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 28 ते 29 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नीती आयोगाचे सदस्य डॉ विनोद पॉल, नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष टी दिलीपकुमार, ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे (TNAI) अध्यक्ष डॉ. रॉय उपस्थित होते.

या अधिवेशनात भारतातील 33 राज्यातील विविध परिचर्या संस्थेतील 2894 विदयार्थी परिचारिकांनी सहभाग घेतला होत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदरची परिषद भरवली जाते त्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच विद्यार्थी नर्सिंग क्षेत्रातील संशोधन पेपरचे सादरीकरण करतात. स्पर्धामध्ये परिचर्या संबंधित विषयांवर रांगोळी, चित्रकला, पेन्सिल, स्केच, एकपात्री नाटक, वक्तृत्व, नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

या अधिवेशनात कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप, महाराष्ट्र राज्य शाखेच्या सचिव वर्षा पाटील, स्टुंडट नर्सिंग असोसिएशनच्या सल्लागार व परिचारिका वैभवी फर्डे, शबाना खान, व प्रचिती तामोरे यांनी सहभाग घेतला. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या सेरेमोनिल परेड मध्ये संस्थेच्या वैभवी फर्डे हिने सहभाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व या स्पर्धेत भारतातील उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग असोसिएशन युनिट हे पारितोषिक प्राप्त केले.

Web Title: Meenatai Thackeray Nursing Training Institute won the 'Outstanding Student Nurses Association' Award in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे