पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:32 AM2017-07-28T00:32:26+5:302017-07-28T00:32:29+5:30

भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे.

meera bhaindar, corporation, news | पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

Next

कल्याण : भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे. त्याबाबतची माहिती निवडणूक अधिकाºयांना देऊन येथील कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देता येणार नसल्याचे कळवावे, असे पत्र विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांना पाठवले आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी २० आॅगस्टला मतदान, तर २१ ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या कामांसाठी केडीएमसीकडे ४०० च्या आसपास कर्मचाºयांची मागणी करण्यात आली आहे. तर, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आतापासूनच रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
मीरा-भार्इंदर ते कल्याण-डोंबिवलीचा प्रवास तीन तासांचा आहे. त्यामुळे तेथे जाऊन काम करण्यास कर्मचारी नाखूश आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक झाल्यास पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनापासून अन्य तातडीच्या कामांसाठी अधिकारी व कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनेक विभागांतील कामे खोळंबतील, याकडे विरोधी पक्षनेते हळबे यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या कर्मचाºयांची तेथील निवडणूक कामांसाठी नेमणूक करण्यापूर्वी तेथील आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात काही विचारणा केली होती का, असल्यास आपण आयुक्त तसेच पदाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे का, असेही सवाल हळबे यांनी केले आहेत.

Web Title: meera bhaindar, corporation, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.