मीरा-भार्इंदर महासभेत क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सत्ताधारी, विरोधी पक्षात तुतू-मैमै
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 08:07 PM2017-10-16T20:07:13+5:302017-10-16T20:07:34+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अद्याप सुरु न झालेल्या एकमेव क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सोमवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांत तुतूमैमै पहावयास मिळाली.
भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अद्याप सुरु न झालेल्या एकमेव क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सोमवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांत तुतूमैमै पहावयास मिळाली. मात्र यात सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर बाजी मारुन हम सो करे कायद्याचा प्रत्यय आणून दिला.
२०१४ मध्ये लोकार्पण झालेले पालिकेचे एकमेव क्रिडा संकुल सध्या कंत्राटदारांच्या करारात अडकुन पडले असताना त्याचे नामकरण मात्र आजच्या महासभेत उरकरण्यात आले. तत्पुर्वी २०१४ मध्ये सुरुवातीला सेनेचे स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांनी या क्रिडा संकुलाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची मागणी पालिकेकडे पत्राद्वारे केली होती. एकमहिन्यानंतर याच क्रिडा संकुलाच्या सुधारित अंदाजपत्रकाचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी मांडला असता त्यात क्रिडा संकुलाला भाजपा नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. वास्तविक स्थायीत नामकरणाचा मंजुर होणारा ठराव ग्राह्य धरला जात नसल्याने त्यावर महासभेत चर्चा केली जाईल, या उद्देशाने त्या ठरावाला सेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली. त्यावेळी त्या ठरावाचे सुचक सेनेचेच स्थायीतील सदस्य प्रशांत दळवी हे होते. सध्या दळवी भाजपाचे नगरसेवक आहेत. तब्बल ३ वर्षानंतर त्या क्रिडा संकुलाला स्व. गोपीनाथ मुंडे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सोमवारच्या विशेष महासभेत सादर केला होता. त्यावर भाजपा सत्ताधाय््राांनी २०१४ मधील स्थायी समिती बैठकीत मुंडे यांच्या नावाचा ठराव मंजुर झाल्याने क्रिडा संकुलाला त्यांचेच नाव देण्याचा मुद्दा उपस्थित करुन नव्याने ठराव मांडला. त्याला सेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवुन सेनेनेच सुरुवातीला धर्मवीर आनंद दिघे यांचेच नाव देण्याची केलेली मागणी ग्राह्य धरण्याचा ठराव मांडला. यावर सेनेचे गटनेने हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, नगरसेवक प्रवीण पाटील तर काँग्रेसचे जुबेर इनामदार, अनिल सावंत यांनी स्थायीत मंजुर झालेला नामकरणाचा ठराव अधिकृतपणे ग्राह्य धरता येत नसल्याचा दावा करीत सत्ताधाय््राांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर दोन्ही बाजुंच्या सदस्यांत जोरदार वादावादी झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी महापौर डिंपल मेहता यांनी दोन्ही बाजुंकडील सदस्यांनी मांडलेल्या ठरावावर मतदान घेण्याचे निर्देश नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना दिले. त्यानुसार पार पडलेल्या मतदानात सत्ताधाय््राांचा ठराव ६१ मताधिक्याने मंजुर झाल्याचे महापौरांकडुन जाहिर करण्यात आले. सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार चालविला असुन यावर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी करुन त्यासाठी विरोधकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलीच पाहिजे, असा दावा केला. परंतु, महापौरांनी निवडणुकीच्या माध्यमातुन सत्ताधा-यांचा ठराव बहुमताने मंजुुर झाल्याचे सांगुन उद्भवलेला गोंधळ शांत केला.
पालिकेच्या पहिल्या विशेष महाभसेत महापौर डिंपल मेहता या अमराठी असल्याने तसेच महापौर पदावरुन सभागृह चालविण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने त्यांच्या ऐवजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनीच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत महापौरांनाच बोलण्याची विनंती केल्याने महापौरांनी मराठी व हिंदी या दुहेरी भाषेचा वापर करुन पहिली सभा निभावुन नेली. सभागृहात भाजपा सत्ताधारी सदस्यांची संख्या ६१ इतकी असल्याने त्यांना सत्ताधाय््राांच्या बाकावर बसण्यास जागा नसल्याने त्यांनी विरोधी पक्षांतील सदस्यांच्या बाजुला ठाण मांडले.