मीरा-भार्इंदरच्या स्केटिंगपटूंची ‘गिनीज’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:49 AM2018-03-27T00:49:13+5:302018-03-27T00:49:13+5:30
मीरा-भार्इंदरमधील १२ स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या कुकिज डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील १२ स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या कुकिज डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला. त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याने त्या स्केटिंगपटूंचा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बेळगाव येथे जून २०१७ मध्ये झालेल्या स्केटिंगच्या ह्युमन चेन प्रकारात अमन राऊत, प्रथम ओस्तवाल, भव्य सोनी, क्रिश मायावंशी, सावित बंगेरा, विजय चापवाले या सहा स्थानिक स्केटिंगपटूंनी सलग ५१ तास स्केटिंग करून जागतिक विक्रमाची नोंद केली होती. त्याची नोंदही गिनीज बुकमध्ये झाल्यानंतर जागतिक विक्रमाची ही दुसरी वेळ आहे. यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बेळगाव येथे जागतिक स्तरावरील कुकिज डंकिंग रिले स्केटिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ स्केटिंगपटूंची निवड झाली होती. त्यात ईशान सावंत, अनुशा कटारिया, जस त्रिवेदी, जान्हवी सोनावणे, दृष्टी जोशी, प्रहश पाठक, जेझेल फर्नांडिस, शॉन विजी, यशवर्धन जैन, गौरव सिंह, युग झुनझुनवाला व अद्वैत पिल्ले यांचा समावेश होता. या १२ जणांच्या चमूने लाँगेस्ट बिस्कीट प्रकारात सलग २६ तास स्केटिंग केले. भारतातून एकूण ३९५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.