मीरा-भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:31 AM2019-08-11T01:31:22+5:302019-08-11T01:32:47+5:30

मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांनी महिला जिल्हाध्यक्ष फ्रिडा मोरायस आणि काही पदाधिकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला आहे.

Meera-Bhayandar NCP's district president enters in BJP | मीरा-भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

मीरा-भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांनी महिला जिल्हाध्यक्ष फ्रिडा मोरायस आणि काही पदाधिकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे येथील कार्यकारिणी बरखास्त झाली असून कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी मात्र दुबोलेंची हकालपट्टी केल्याचे सांगितले.

मीरा-भार्इंदरमध्ये एकेकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार असणारी राष्ट्रवादी काँग्रेस २०१७च्या महापालिका निवडणुकीआधी नाममात्र उरली. पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे भाजप, तसेच शिवसेनेत गेले. पालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दाणदाण उडाली. दरम्यान, नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली, तर नाईक समर्थक फ्रिडा मोरायस यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली.

आता गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मीरा-भार्इंदरमध्येदेखील राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाणार, हे निश्चित होते. दुबोले यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेश सरचिटणीस यांच्याकडे दिला. कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर आणि निरीक्षक अशोक पराडकर यांच्या गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचे दुबोले म्हणाले. त्यानंतर, शुक्रवारी दुबोले यांनी फ्रिडा व काही पदाधिकाऱ्यांसह भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी किमान वेतन महामंडळ अध्यक्ष आसीफ शेख, ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील आदी हजर होते. दुबोले, फ्रिडा आदींच्या भाजप प्रवेशाने पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

दरम्यान, पेंडुरकर यांनी मात्र दुबोले यांची पक्षाने हकालपट्टी केलेली असून, त्यांनी स्वार्थासाठी पक्ष व पदाचा वापर चालवला होता. याआधी त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास आम्ही विरोध केला होता. लोकहिताचे विषय न घेता तेच गटबाजी करत होते. त्यांचे भाऊ रवी दुबोले पालिकेचे ठेकेदार असून त्यांची सत्ताधारी भाजपने कोंडी केली होती, असे पेंडुरकर म्हणाले.

Web Title: Meera-Bhayandar NCP's district president enters in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.