मीरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता : मार्चमध्ये मिळणार १० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:03 AM2017-10-13T02:03:40+5:302017-10-13T02:03:51+5:30

मीरा-भार्इंदरला एमआयडीसीच्या कोट्यातून उपलब्ध झालेल्या ७५ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा एप्रिलपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. तर उर्वरित २५ पैकी १० एमएलडी पाणीपुरवठा मार्च २०१८ मध्ये उपलब्ध होणार आहे.

 Meera-Bhayandarkar Anand: It will get 10 MLD water in March | मीरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता : मार्चमध्ये मिळणार १० एमएलडी पाणी

मीरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता : मार्चमध्ये मिळणार १० एमएलडी पाणी

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला एमआयडीसीच्या कोट्यातून उपलब्ध झालेल्या ७५ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा एप्रिलपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. तर उर्वरित २५ पैकी १० एमएलडी पाणीपुरवठा मार्च २०१८ मध्ये उपलब्ध होणार आहे. दरवर्षी ऐन पाणीकपातीत शहराला दिलासा मिळणार असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.
शहराला एमआयडीसीकडून १०० तर स्टेमकडून ८६ असा एकूण १८६ एमएलडी पाणीपुरवठा सध्या उपलब्ध होत आहे. यात आणखी २५ एमएलडी पाणीपुरवठ्याची भर पडणार असल्याने शहराला भविष्यात २११ एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. पालिकेकडून शहराची लोकसंख्या १० लाखांपर्यंत गृहीत धरण्यात आली असली तरी ती प्रत्यक्षात १२ लाखांवर पोहचली आहे. १० लाख लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला २३६ एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. यावरून शहराला शिल्लक २५ एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यानंतरही आणखी २५ एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासणार आहे. प्रत्यक्षात मात्र १२ लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी भविष्यात मिळणारे पाणीसुद्धा अपुरेच ठरणार आहे. तूर्तास तरी शहरातील पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी प्रशासनाने यापूर्वी अपुºया पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी २०११ पासून नवीन नळजोडणी देणे बंद केले होते. यामुळे नवीन इमारतीमधील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा होत होता.
सध्या काहीप्रमाणात पुरेसे पाणी शहराला मिळाल्याने त्या नवीन इमारतींना नियमानुसार नवीन नळजोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. टँकरचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शहराची मदार सूर्या धरण प्रकल्पातून मिळणाºया सुमारे २०८ एमएलडी पाण्यावर अवलंबून राहणार आहे. सध्या मिळणाºया १८६ एमएलडी पाणीपुरवठ्यातील ५० एमएलडी पाणी मिळत असून या योजनेतील मुख्य जलवाहिनीचे शहरातंर्गत क्रॉस कनेक्शनच्या कामांसह पाणी साठवणूक करणाºया टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ७५ एमएलडीमधील शिल्लक २५ एमएलडी पाणी उचलणे पालिकेला तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते टप्याटप्याने उचलण्यात येणार असून त्यापैकी १० एमएलडी पाणी मार्च २०१८ मध्ये उचलण्यात येणार आहे.

Web Title:  Meera-Bhayandarkar Anand: It will get 10 MLD water in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी