मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली
By धीरज परब | Published: October 17, 2023 04:39 PM2023-10-17T16:39:44+5:302023-10-17T16:40:43+5:30
Police: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांना शासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत अन्यत्र बदली केल्याने पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांना शासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत अन्यत्र बदली केल्याने पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
शासनाने १३ ऑक्टोबर रोजी राज्यातील १०४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यात मीरा भाईदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
मानवी संसाधन विभागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांची नागपूर शहर तर भाईंदरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटलाल पाटील यांची पिंपरी - चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
माणिकपूर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील, विरारचे पोलिस निरीक्षक दीपक शिंदे व अर्नाळा चे कल्याणराव कर्पे यांची मुंबईत तर विशेष शाखेतील प्रविण कदम यांची दहशतवाद विरोधी पथक मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती ने बदली झाली आहे.
पोलिस आयुक्तालयातील या कार्यक्रम वेळी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त मख्यालय विजयकुमार मराठे व विशेष शाखाचे बजरंग देसाई आणि अन्य अधिकारी उपस्थीत होते.