मीरा - भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी जाहीर केली ५२ गणेश मूर्ती स्वीकृत केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 10:04 PM2020-08-19T22:04:14+5:302020-08-19T22:05:38+5:30

महापालिका दरवर्षी शहरातील तलाव , खाडी किनारे , नदी व समुद्र किनारी विसर्जनाची सोया करते . यंदा कोरोना संक्रमण मुळे महापालिकेने सर्व विसर्जन ठिकाणे बंद केली आहेत .

Meera - Bhayander Municipal Corporation announces 52 Ganesha idol sanctioned centers for Ganeshotsav | मीरा - भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी जाहीर केली ५२ गणेश मूर्ती स्वीकृत केंद्र

मीरा - भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी जाहीर केली ५२ गणेश मूर्ती स्वीकृत केंद्र

Next

मीरारोड - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने शहरी भागातील विसर्जन ठिकाणं बंद ठेवली असून शहरात ५२ गणेश मूर्ती स्वीकृती केंद्र पालिकेने उभारली आहेत . तर घरात वा सोसायटी आवारातच गणेशमूर्तीचे विसर्जनाचे आवाहन पोलीस व महापालिकेने केले आहे . 

महापालिका दरवर्षी शहरातील तलाव , खाडी किनारे , नदी व समुद्र किनारी विसर्जनाची सोया करते . यंदा कोरोना संक्रमण मुळे महापालिकेने सर्व विसर्जन ठिकाणे बंद केली आहेत . त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी जाण्यास नागरिकांना मनाई केली आहे . घरगुती मूर्ती २ फूट तर सार्वजनिक ४ फुटा पेक्षा जास्त असू नये.  शाडू मातीची वा पर्यावरण पूरक मूर्ती बसवा असे आवाहन पालिकेने केले असले तरी त्या आधीच बहुतांशी भाविकांनी मुर्त्यांची ऑर्डर दिलेली होती . 

भाविकांनी घरीच किंवा सोसायटी आवारात कृत्रिम तलाव - हौद उभारून गणेश मूर्तींचे विसर्ज करावे . किंवा संगमरवर , धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे पालिकेने म्हटले असले तरी कुठे गैरसोय होऊ नये म्हणून गणेश मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली आहेत . गणेश विसर्जनासाठी  शहरात एकूण ५२  मूर्ती स्वीकृती केंद्र तयार केली आहेत . भाविकांनी आपल्या जवळच्या स्वीकृती केंद्रात जाऊन आपली गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांना द्यायची आहे. पालिका नंतर त्या मुर्त्या तलाव वा खाडीत विसर्जन करणार आहेत . 

महापालिके मार्फत  खालील परिसरात गणेश मूर्ती स्वीकृती केंद्र तयार केले जाणार आहेत  

भाईंदर पश्चिम परिसर 

प्रभाग १ -मक्सेस मॉल, सेकंडरी शाळा , महाराज स्वीटस फाटक रोड 

प्रभाग २ - सदानंद हॉटेल , शिवसेना गल्ली, वेलकांनी शाळा, नवरंग हॉटेल  , जैन मंदिर , जय अबे नगर 

भाईंदर पूर्व 

प्रभाग ३ - खारीगाव, केबिन रोड, प्रशांत हॉटेल जवळ, नाकोडा मज्जीद  समोर , गोडदेव नाका, बंदर वाडी शिवसेना शाखा, श्री राम ज्वेलर्स बाजूला, काशी विश्वनाथ मंदिर , फादर जोसेफ शाळा, नवघर हनुमान मंदिर, नवघर गाव , शिर्डी नगर , नवघर गावदेवी मैदान 

मीरारोड परिसर 

प्रभाग ४ - दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट डावी व उजवी बाजू , स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुल , ओम शांती चौक, सेव्हन इलेव्हन शाळा चौक , स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, रामदेव पार्क, स्व. मीनाताई ठाकरे चौक, काशिगाव, जे.पी. इन्फ्रा घोडबंदर, हटके चौक, गौरव सिटी चौक, एम. आय.जी कॉम्प्लेक्स,  कनकिया स्टार मार्केट , कनकिया सॅन्याँम शाळा 

प्रभाग ५ - प्रभाग समिती कार्यालय, शरयू माता चौक, मिरा रोड रेल्वे स्थानक, शांती नगर सेक्टर ४ मैदान 

प्रभाग ६ -  महाविष्णू मंदिर मिरा गावठाण, प्रभाग समिती कार्यालय, सेंट पॉल शाळेसमोर , डॉन बॉस्को शाळा प्लेझंट पार्क , डॉन बॉस्को शाळा शांती पार्क, सेंट झेवियर शाळा , होली क्रॉस शाळा शितल नगर ,  जांगिड स्कूल शांती पार्क , सिल्व्हर पार्क

Web Title: Meera - Bhayander Municipal Corporation announces 52 Ganesha idol sanctioned centers for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.