मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

By धीरज परब | Published: July 3, 2024 11:30 AM2024-07-03T11:30:57+5:302024-07-03T11:31:14+5:30

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते.

Meera Bhayander - Vasai Virar Police Constable Written Exam on 7th July | मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती मध्ये मैदानी चाचणीत ६ हजार ४१२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी हि मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क जवळील पालिका आरक्षण क्र . ३०० व परिसरात झाली . 

पोलिसांनी घेतलेल्या मैदानी चाचणी परीक्षेत  ४ हजार ८७७ व महिला १ हजार ५३५ महिला असे एकूण ६ हजार ४१२ उमेदवार पात्र ठरले.  मैदानी चहसानी नंतर आता त्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा हि ७ जुलै रोजी मीरारोडच्या कनकिया भागातील  एल.आर. तिवारी इंजिनिअरिंग अँड डिग्री कॉलेज येथे होणार आहे . 

लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी ७ जुलै रोजी सकाळी ९ वा. हजर राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारास त्यांचा असं क्रमांक आदी माहिती मॅसेज द्वारे पाठवली जाणार आहे.  सकाळी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराची काटेकोर तपासणी करून नंतरच त्याला परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. परिक्षेसाठी लागणारे सर्व आवश्यक लेखन साहित्य पोलीस प्रशासनाकडूनच दिले जाणार आहे.  प्रत्यक्ष परीक्षा सकाळी ११ वाजता सूरू होणार आहे.  पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल हा पोलीस आयुक्तलयाच्या संकेतस्थळ वर प्रसिद्ध केला जाणार आहे. 

 

Web Title: Meera Bhayander - Vasai Virar Police Constable Written Exam on 7th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.