शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

By धीरज परब | Published: May 30, 2024 08:57 PM2024-05-30T20:57:17+5:302024-05-30T20:59:25+5:30

सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे.

Meera Bhayanderkar is relieved as Friday shutdown is postponed | शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

मीरारोड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्या शुक्रवार ३१ मे रोजी घेण्यात येणारा २४ तासांचा  शटडाऊन स्थगित करून तो ५ जून घेण्यात येणार आहे . त्यामुळे सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु आधीच अपुरे पाणी त्यात मीरा भाईंदर हे पाणी पुरवठा धरण पासून शेवटच्या टोकाला असल्याने नागरिकांना नेहमीच पाणी टंचाई सोसावी लागते.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच शटडाऊन जाहीर करण्यात आला होता . परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला .  पावसाळ्यापुर्वी दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणेकरीता  स्टेम प्राधिकरणा मार्फत होणारा पाणी पुरवठा  बुधवार २९ मे रोजी सकाळी  ९ ते गुरुवार ३० मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासां करीता बंद करण्यात आला . 

त्या पाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बारवी येथे मान्सुन पुर्व देखभाल दुरुस्तीची कामे करणेकरीता गुरुवार ३० मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तासांकरीता पाणी पुरवठा बंद राहणार होता . सलग दोन शटडाऊन मुळे शहरात पाणी टंचाई बिकट झाली असती.

Web Title: Meera Bhayanderkar is relieved as Friday shutdown is postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.