मीरारोडची सोनाली ठक्कर दिल्लीत परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:13 PM2020-03-03T18:13:33+5:302020-03-03T18:13:33+5:30
चीनच्या एका शिपिंग कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करणारी सोनाली जहाज चायना वरून जपानला जात असताना कोरोना मुळे जपान ने जहाज समुद्रातच रोखले .
मीरारोड - जपान जवळील एका जहाजावर अडकलेली मीरा रोडची सोनाली ठक्कर सह जहाजावरील 18 भारतीयांना दिल्ली येथे आणण्यात आले आहे . त्यांना एका रुग्णालयात ठेवले असून 14 दिवस नंतर तिला घरी पाठवले जाणार असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली .
चीनच्या एका शिपिंग कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करणारी सोनाली जहाज चायना वरून जपानला जात असताना कोरोना मुळे जपान ने जहाज समुद्रातच रोखले . सोनाली १८ दिवस त्या जहाजावर एका केबिन मध्ये बंदिस्त होती . मदतीसाठी तिने कुटुंबियांशी संपर्क साधला होता .
काही दिवसापूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या ठाण्यातील 'उपवन आर्ट फेस्टिवल'च्या उदघाटनाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आले होते. त्यावेळी सोनाली हिच्या वडिलांनी राज्यपालां कडे मुलीला परत आणा अशी विनंती केली होती . सोनाली सह इतर भारतीय नागरिकांना देशात आणावे यासाठी सरनाईक यांनीही सरकारला विनंती केली.
राज्यपालांनी केंद्र सरकारशी चर्चा केली होती. केंद्र सरकारने एक विशेष पथक पाठवून त्या बोटीवर असलेल्या सर्व 18 भारतीयांना तीन दिवसापूर्वी भारतात परत आणले. या सर्व 18 भारतीयांना दिल्लीत एका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यात सोनाली हीचा सुद्धा समावेश आहे. या कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.