ठाण्यात पक्षिमित्रांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:27 AM2017-07-24T06:27:03+5:302017-07-24T06:27:03+5:30
पक्ष्यांबाबत अधिकाधिक लोकांना माहिती मिळावी, तसेच प$$क्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भरविण्यात येणारे यंदाचे
स्नेहा पावसकर/ लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पक्ष्यांबाबत अधिकाधिक लोकांना माहिती मिळावी, तसेच प$$क्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भरविण्यात येणारे यंदाचे राज्यस्तरीय ३१ वे पक्षीमित्र संमेलन यंदा ठाण्यात आयोजिण्यात येणार आहे. २५-२६ नोव्हेंबर रोजी हे संमेलन रंगणार असून या संमेलनाच्या निमित्ताने ठाण्यात राज्यभरातील पक्षीमित्रांचा जणू मेळाच भरणार आहे.
महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेच्यावतीने आणि होपच्या पुढाकाराने यंदाचे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात होणार आहे. ग्रामीण भागात पक्ष्यांच्या विविध जाती, प्रकार पाहायला मिळतात. तसेच त्यांचे वास्तव्यही रानांमधील विविध झाडा-झुडुपांवर असते. त्यामुळे हे संमेलन बहुतांशी करू न ग्रामीण भागात आयोजिले जाते. यंदा शहरातील पक्षी आणि येथील वातावरणाचा त्यांच्यावर होणार परिणाम आणि त्यादृष्टीने त्यांचे आवश्यक असलेले संरक्षण आणि संवर्धन याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हे संमेलन ठाणे शहरात आयोजिले आहे. मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र, प्रेझेंटेशन, नेचर ट्रेल अशा विविध सत्रांनी हे संमेलन रंगणार आहे. संमेलनात विविध पक्ष्यांच्या जाती-प्रजातींची माहिती, त्यांच्या संवर्धनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच पक्ष्यांचे आरोग्य आणि वातावरण यावर वैज्ञानिक दृष्टया आधारीत चर्चासत्र होणार आहे. तसेच पक्षीतज्ज्ञ किंवा पक्षीमित्र यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या संमेलनात पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पक्षीतज्ज्ञ नसले तरी जे पक्षीमित्र आहेत किंवा जे उत्तम निरीक्षक आहेत, त्यांना आपले निवडक प्रेझेंटेशन सादर करता येणार आहे. दोन दिवसीय संमेलनातील एका दिवशी नेचर ट्रेलचा आनंदही पक्षीमित्रांना घेता येणार आहे.
राज्यस्तरीय अशा या संमेलनात ठाणे, मुंबई , रायगडसह विविध जिल्हयातील मिळून सुमारे ५०० पक्षीमित्र सहभागी होण्याची शक्यता आयोजक असलेल्या होप संस्थेने वर्तविली आहे. यापूर्वीही एकदा ठाण्यात राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन भरले होते आणि विशेष म्हणजे तेही होप संस्थेनेच आयोजिले होते.
ठाणे खाडीत फ्लेमिंगो सेंच्युरी
ठाणे खाडीत वर्षभरात सुमारे २०० प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. परंतु येथील फ्लेमिंगोंचे सर्वांनाच कायम आकर्षण असते. ठाणे खाडीला अलीकडेच ‘फ्लॅमिंगो सेंचुरी’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे फ्लेमिंगो तसेच इतर काही नवीन पक्ष्यांसाठी स्थळ म्हणूून ठाणे खाडीचा पर्याय योग्य आहे