पारसिक चौपाटीबाधितांच्या पुनर्वसनासाठी मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:44 PM2020-01-02T23:44:43+5:302020-01-02T23:44:48+5:30

महापौरांचे आश्वासन; एकनाथ शिंदे काढणार तोडगा

Meeting in the Ministry for the Rehabilitation of Parsik Chowpatabhidas | पारसिक चौपाटीबाधितांच्या पुनर्वसनासाठी मंत्रालयात बैठक

पारसिक चौपाटीबाधितांच्या पुनर्वसनासाठी मंत्रालयात बैठक

googlenewsNext

ठाणे : पारसिक चौपाटीच्या कामात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे बाधित व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. त्यानंतर, पुढील आठवड्यात गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

ठाणे महापालिकेने पारसिक चौपाटीचे काम हाती घेतले आहे. ती विकसित करताना येथे झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली होती. त्यावेळेस बाधित रहिवासी अथवा व्यापाºयांचे पुनर्वसन केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु, विस्थापितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन पूर्ण न झाल्याने या चौपाटीला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

याप्रकरणी एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू असूनही स्थानिकांना विस्थापित करून त्यांचा व्यवसाय बंद करून या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे रेटले जात आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल असून हरित लवादाकडेदेखील सुनावणी सुरू आहे. तसेच पुनर्वसन करण्यात येत नसल्याने स्थानिकांनी या चौपाटीच्या कामाला विरोधही केला होता.

चार वर्षांपूर्वी रेतीबंदर परिसरातील १०३ व्यापाºयांची बैठक घेऊन सर्व विस्थापित व्यापाºयांना गाळे देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र, अजून कोणत्याही व्यापाºयाला गाळे दिले नसून प्रशासन दिलेले आश्वासन विसरले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

५00 फुटांचे गाळे देण्याची मागणी
यासंदर्भात गुरुवारी महापौर दालनात महापौर नरेश म्हस्के यांची उमेश पाटील, दशरथ पाटील यांच्यासोबत व्यापाºयांनी भेट घेतली. यावेळी बाधितांचे पुनर्वसन करावे, यावर साधकबाधक चर्चा झाली. तसेच ५०० चौरस फुटांचे गाळे मिळावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
१८० चौरस फुटांचे गाळे घेण्यास त्यांनी नकार दिला. या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
पुढील आठवड्यात मंत्रालयात एकनाथ शिंदे यांच्या दालनात महसूलमंत्र्यांसमवेत जागेचा तिढा सोडविण्यासाठी बैठकही लावली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानुसार, आता बैठकीनंतरच पुढील दिशा ठरणार आहे.

Web Title: Meeting in the Ministry for the Rehabilitation of Parsik Chowpatabhidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.