रमजानच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
By admin | Published: June 2, 2017 04:52 AM2017-06-02T04:52:18+5:302017-06-02T04:52:18+5:30
मुस्लिम बांधवांच्या रमजानला रविवारपासून सुरुवात झाली. या काळात शहारात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मुस्लिम बांधवांच्या रमजानला रविवारपासून सुरुवात झाली. या काळात शहारात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सोशल मिडियातून आक्षेपार्ह मजकुर, फोटो प्रसारित करु नये, असे आवाहन पोलीस निरिक्षक घनश्याम आढाव यांनी केले. रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव, सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार व पोलीस उपस्थित होते. या काळात शहारात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक प्रयत्न करित आहेत. शांतता कमिटीच्या सदस्यांनी सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मिडियाचा वापर जपून करावा. तेढ निर्माण करणाऱ्यांची माहिती पोलीसांना द्यावी, असे आवाहन सुरेश घाडगे यांनी केले.