वाहतुकीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप पालिकेवर टीका, आरटीओ, वाहतूक पोलिसांवरही झोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:05 AM2017-09-16T06:05:34+5:302017-09-16T06:08:03+5:30

डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची भ्भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.

 In the meeting of the transport committee, the criticism, criticism, criticism of police, RTO, traffic police too | वाहतुकीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप पालिकेवर टीका, आरटीओ, वाहतूक पोलिसांवरही झोड  

वाहतुकीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप पालिकेवर टीका, आरटीओ, वाहतूक पोलिसांवरही झोड  

Next

डोंबिवली : डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची  भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.
वाहतूक कोंडी, रिक्षातील चौथी सीट, अनधिकृत स्टँडचा सुळसुळाट यातून प्रवासी आणि रिक्षाचालकांतील मतभेद मिटवण्यासाठी, समेट घडवून आणण्यासाठी शुक्रवारी बैठक पार पडली. वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला पालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत असल्याचा ठपका रिक्षा युनियनने ठेवला. चौथी सीट घेतल्याने रिक्षेवर कारवाई होणार असेल तर जादा प्रवासी भरल्याने ण्याबद्दल जो कोणी नियम तोडत असेल त्याच्यावर कारवाई करा, पण केडीएमटीवर कारवाई करा, अशी भूमिका रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी घेतली. आरटीओ-ट्रॅफिकने चौथ्या सीटबाबत एकदाच भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. रिक्षाचालकावर प्रवाशाने हात उचलला तर त्याची जबाबदारी प्रवासी संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगताच प्रवासी संस्थांनी ही जबाबदारी आमची नाही, असे स्पष्ट केले. वाहतूक सुधारणा अहवालाची अंमलबजावणी पालिकेने न केल्याचा मुद्दाही गाजला.
 

Web Title:  In the meeting of the transport committee, the criticism, criticism, criticism of police, RTO, traffic police too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.