पोलीस आयुक्तालयाकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन

By धीरज परब | Published: February 7, 2024 07:54 PM2024-02-07T19:54:07+5:302024-02-07T19:54:43+5:30

सायबर क्राईम , तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट , अमली पदार्थ बाबत केले मार्गदर्शन 

meetings of headmasters and principals by police commissionerate | पोलीस आयुक्तालयाकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन

पोलीस आयुक्तालयाकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -  सोशल मीडियावर पोस्ट - कमेंट करताना सामाजिक बांधिलकी जपत शिष्टाचार पाळा असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडेय यांनी प्राचार्य व मुख्याध्यापकांना केले आहे . 

मीरा भाईंदर मधील दोन गटातील वादातून निर्माण झालेला तणाव , वाढते सायबर गुन्हे आदींच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील संवाद सभागृहात मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील प्राचार्य व मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली . या बैठकीला पोलीस आयुक्त मधुकर पांडेय सह अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ चे प्रकाश गायकवाड तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व शहरातील १३० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , सोशल मिडिया वर पोस्ट करताना शिष्टाचाराचे पालन करा. कोणाचीही भावना दुखावणार नाही , जाती - धर्मात तेढ होणार नाही , कायदा व सुव्यवस्था आपल्या पोस्ट मुळे बिघडणार नाही याबाबत खबरदारी घेवुन पोस्ट करा .  सायबर क्राईम बाबत माहीती देताना केवायसी अपडेट करताना, क्रेडीट कार्ड पॉइट अपडेट, विज बिल भरणा , ऑनलाईन शॉपींग संदर्भातील सायबर गुन्हे घडण्या बद्दल माहिती देण्यात आली .  फसव्या एसएमएस पासुन सावधान राहणे, टेलीग्राम, व्हॉटसप वर प्राप्त अनोळखी लिंक किंवा अॅप डाउनलोड करु नका . 

अंमली पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगतानाच जर  महाविद्यालये व शाळांच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री , सेवन आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा . प्रत्येक पोलीस ठाणे निहाय एक पथक तयार करून ते पथक पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालय यांना भेट देईल . विद्यार्थी यांना सायबर क्राईम, अंमली पदार्थ, मोबाईल वापराबाबतचे दुष्परिणाम, सोशल मिडियावर जाती व धर्मा बाबत तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित न करणे , मुलींना गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती देणे आदी कार्य हे पथक करणार आहे . 

बैठकीतील माहिती तुमच्या तुमच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पण द्या असे आवाहन पोलीस आयुक्तांनी उपस्थित प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना केले . 

Web Title: meetings of headmasters and principals by police commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.